सिन्नर
तालुक्यातील मानोरी शिवारातील एका विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, मानोरी शिवारातील चांगदेव करडेल नामक शेतकरी आज(दि२४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतात खत टाकण्याचे काम करत होते. त्याचवेळी त्यांना जवळच असणाऱ्या एका विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने त्या विहिरीत डोकावले असता त्यांना प्लास्टिकच्या गोणीत बांधलेला मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. दरम्यान, याबाबतची अधिक माहिती वावी पोलीस ठाण्याला दिली. यानंतर तात्काळ वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह नांदूरशिंगोटे दूरक्षेत्र व वावी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. पुढील तपास वावी पोलीस करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच ही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…