जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याने केली महिलेकडे भलतीच मागणी

जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याने केली महिलेकडे भलतीच मागणी

उपनगर पोलिसांत   पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : प्रतिनिधी

जातीवाचक उदगार काढून शरीरसंबंधाची मागणी
करून महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य
सहायक निबंधक कार्यालयात घडले. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून
सहाय्यक जिल्हा निबंधक कैलास दवंगे यांच्यासह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित महिलेने उपनगर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीचा आशय़ असा- दुय्यम निबंधक कार्यालय, वर्ग दोन येथे सदर महिला ही १ ऑक्टोबर २०२० रोजी खासगी ऑपरेटर म्हणून कामाला लागली होती. नोकरी करत असताना तेथील दुय्यम निबंधक प्रवीण चौधरी यांनी या महिलेशी अश्लील भाषेत संवाद साधत तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे गैरकृत्य केले. महिलेला त्रास देणे त्यांनी सुरुच ठेवले. या महिलेला कार्यालयाला सुटी असताना कार्यालयात बोलावून घेत तिच्याकडे पुन्हा शरीर सुखाची मागणी केली. नोकरीची तीव्र गरज असल्याने ही महिला हा त्रास सहन करत राहिली. या महिलने त्यानंतर एस. टू. इंफोटेक कंपनीचे इंजिनिअर देवीदास कोल्हे यांना ही घटना सांगितली. मात्र, त्यांनी नोकरी करताना अशी तडजोड करावी, लागते असे सांगून महिलेला नाशिकच्या बाहेर एकटी भेट, असे सांगितले. त्यानंतर या महिलेची सहाय्यक निबंधक कार्यालयात बदली झाली. तेथे  कैलास दवंगे यांनीही या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. २०२३ मध्ये महिलेची सिन्नर कार्यालयात बदली झाल्यानंतर लिपिक असलेले प्रभारी अजय पवार यांनी त्या महिलेला चौधरी व कोल्हे साहेबांनी बोलावले आहे, असे सांगितले. त्यानंतर सिन्नर कार्यालयातील दुय्यम निबंधक सागर बच्छाव यांनी देखील जानेवारी २०२४ मध्ये पिडीत महिलेशी गैरवर्तन करून जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी साहेबांचे नाव घेऊ नको, पैसे देतील, तडजोड करून घे, असे आमिष दाखवले. या छळाला कंटाळलेल्या महिलेने उपनगर पोलिस ठाण्यात सह जिल्हा निबंधकासह पाच जणांविरुध्द तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *