नाशिक

बहुगुणी उपचारपद्धती : अॅक्युपंक्चर

बहुगुणी उपचारपद्धती : अॅक्युपंक्चर
अॅक्युपंक्चर ही चिनी पद्धत असून , अॅक्स म्हणजे सुई व पंक्चर म्हणजे टोचणे , शरीराच्या विशिष्ट बिंदूवर जर सुईने टोचले तर त्या बिंदूची शक्ती वाढून शरीरातील व्याधी / विकार / आजार बरा होतो . चीनमध्ये ही उपचारपद्धती फार लोकप्रिय असून , सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून गणला जातो . त्या देशात या उपचारपद्धतीचा अवलंब फार मोठ्या प्रमाणावर केला जातो . यावरून या उपचारपद्धतीचे महत्त्व समजून येते . . फार पूर्वीच्या काळापासून या उपचारपद्धतीचा उगम झाला असून , पूर्वी मनुष्यप्राणी उत्तर ध्रुवाजवळ राहत होता . त्याठिकाणी बर्फाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथे पाणी , झाडे , वनस्पती नसल्यामुळे तेथील मनुष्यप्राणी बर्फाचे अनुकूचीदार तुकडे बनवून शरीराच्या विशिष्ट भागावर टोचून विकार बरा करीत असत . परंतु मनुष्यप्राण्याची वाटचाल कालांतराने उत्तर ध्रुवाकडून हिमालयाकडे झाली . त्यावेळी त्याला वनस्पती , कंदमुळे , कडधान्ये या गोष्टी मिळाल्यामुळे त्यातच आयुर्वेदाच्या रूपाने आजार बरा करण्यासाठी याचा वापर करू लागला . त्यामुळे अॅक्युपंक्चर शास्त्राकडे दुर्लक्ष होऊन भारतातून या उपचारपद्धतीचा लोप होत गेला . तद्नंतर अॅक्युपंक्चर उपचारपद्धती बौद्ध भिक्षूंकडे व आर्यांकडून चीनकडे गेली . तेथे या पद्धतीला माऊत्से तुंग नेत्याच्या कारकीर्दीत राजाश्रय मिळाल्यामुळे या पद्धतीचा चीनमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रचार झाल्यामुळे तेथील शास्त्रज्ञांनी या शास्त्रावर दिवसेंदिवस संशोधन करून या शास्त्राचा उपयोग भूल देण्यासाठी करण्यात येऊ लागला . त्यामुळे कितीही अवघड शस्त्रक्रिया सोप्या व सुलभ रीतीने अॅक्युपंक्चर शास्त्राद्वारे केली जाते . जुनाट आजार बरे सन १ ९ ७१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी चीनला भेट दिली तेव्हा त्यांच्याबरोबर तज्ज्ञ लोकांची एक तुकडी होती . चीनमधील दौच्यात त्यातील काही प्रतिनिधी आजारी पडले . त्यावेळी त्यांच्यावर अॅक्युपंक्चर पद्धतीने उपचार करण्यात आले . अमेरिकेला परतल्यावर त्यांनी तज्ज्ञ शास्त्रज्ञांची एक तुकडी चीनला पाठवली व अॅक्युपंक्चर या पद्धतीचा सखोल अभ्यास करण्यास लावून या शास्त्राला जगापुढे दर्जा देण्याचा प्रयत्न केला . या उपचारपद्धतीत कोणत्याही प्रकारच्या औषधांचा उपयोग करण्यात येत नसून आपल्या शरीरातील अवयवांची व शरीराची प्रतिकारशक्ती वाढून जुनाट असे आजार कायमस्वरूपी बरे केले जातात . यात स्टनेलेस स्टीलच्या फिलीफॉर्म निडल्स २४ X ३० गेजच्या वापरून त्यांनी ४० मिनिटांच्या कालावधीसाठी शरीरावरील बिंदूला टोचून या बिंदूची शक्ती वाढून मेरिडियनमधील अडथळा दूर करून व्याधी / आजार बरा केला जातो . सध्या ही उपचारपद्धती चीन , अमेरिका , इंग्लंड , फ्रान्स , जर्मनी , जपान , कोरिया , श्रीलंका या देशात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे .
अॅक्युपंक्चर ही भारतातील प्राचीन उपचारपद्धती होती . पण ती पूर्वी भारतात प्रचलित न झाल्यामुळे या पद्धतीचे बरेच नुकसान झाले आहे . त्यामुळे लोकांना या पद्धतीचे बरेच तोकडे ज्ञान असून , ही पद्धत भारतात हळूहळू पण लवकरात लवकर प्रसिद्धीच्या झोतात आली आहे . ही पद्धत अतिशय परिणामकारक असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या पद्धतीस मान्यता दिली आहे . या उपचारपद्धतीत ब्रॉन्कायटीस , साधारणतः अस्थमा , अॅसिडिटी , पोटदुखी , कंबरदुखी , गतिमंद , टाचदुखी , फिट्स येणे , पार्किन्सन , स्पाँडीलोसिस , डोकेदुखी , सायटिका , पोलिओ , अर्धांगवायू , मानसिक दुर्बलता , लैंगिक दुर्बलता , स्त्रीरोग , लकवा , बहिरेपणा , मुकेपणा , संधिवात , मणक्याचे विकार , गुडघेदुखी , पाठदुखी , सर्दी , मधुमेहामुळे आलेली कमजोरी , लठ्ठपणा इ . व्याधींवर यशस्वीरीत्या उपयोग केला जातो व जुनाट रोगापासून रोम्याची मुक्तता केली जाते . प्राचीन काळातील आयुर्वेद ऋषींनी आपले शरीर सतेज , आरोग्यमय व बलवान करण्यासाठी शरीरावर मसाज करण्याला आग्रह केला . शरीरावर मसाज करण्याचा प्राचीन आग्रह हा अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशर स्त्रोताचा अमूल्य ठेवा आहे . जुन्या काळात काही राजे आपल्या शरीराला मालिश करण्यासाठी वैद्य ठेवत असे . त्याने तन , मन , स्वास्थ यौवनपूर्ण राहत असे . कारण मसाज केल्याने कळत
वैद्य नकळत अॅक्युप्रेशर ही क्रिया होऊन बिंदूवर जाते पडून तन मनाच्या प्रत्येक अंगात प्राण प्रम मंचर वेगाने होतो . दररोज काम करता करता शरीराच्या मांसपेशी , नसा , मेरिडियन्स थकून सुस्त होऊन जातात . मालिश केल्याने शरीराला व पूर्ण आराम मिळतो म्हणजेच त्या भागात न अॅक्युप्रेशर होते . भीष्माचार्यांना बाणाच्या रुप्येवर झोपवून उत्तरायणापर्यंत जिवंत ठेवले गेल्याचा महाभारतात दाखला आहे . कान टोचणे , नाक टोचणे , डाग देणे , नस धरणे इ . ग्रामिण भागातील पद्धती या शास्त्राशी संबंधित आहेत . अशा या सुरक्षित आणि बहुगुणी रोगोपचार पद्धतीचा प्रचार व प्रसारक डॉ . सौ . संतोषी एम . पाटील या आयुर्वेद व अॅक्युपंक्चर शास्त्रातील तज्ज्ञ असून , सातपूर कॉलनी ( नाशिक ) येथे त्यांचे कृपासाई हेल्थ केअर , पैरालिसीस व मल्टिस्पेशालिटी अॅक्युपंक्चरचे हॉस्पिटल सुरू आहे . या पद्धतीत महिन्यातून १० दिवस रोज ४० मिनिटे याप्रमाणे उपचार केले जातात . आजार जितका जुना तितका उपचाराला कालावधी जास्त लागतो . याबरोबरच डॉ . सौ . संतोषी पाटील या चायनीज ऑन्सिलरी टेक्निक्सचा आयुर्वेद , अॅक्युपंक्चर सोबत उपचार करतात . यामध्ये इलेक्ट्रो अॅक्युपंक्चर , मॉक्सीबुश्चन , प्लम – ब्लॉसम , कपिंग थेरपी , पॉइंट इंजेक्शन बेरपीच्या त्या पारंगत असून , त्याचा रुग्णांवर जुनाट व्याधींसाठी खूप परिणामकारक फायदा झाल्याचे दिसून येते .
डॉ . सौ . संतोषी एम . पाटील B.A.M.S. , P.G.D.E.M.S. B.T.C.M. D.T.C.M.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago