मुंबई बॉम्ब स्फोटातील संशयितासोबत बडगुजरांचे फोटो व्हायरल
आ. नितेश राणेंचा विधानसभेत गौप्यस्फोट, शिंदे गटाकडून चौकशीची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा झालेल्या सलीम शेख सोबत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगत हे धक्कादायक असल्याचे सांगितले. तर बडगुजर यांना नाशिक मध्ये काही भयानक घडवायचे आहे का ? याची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे यांनी केली. दरम्यान बडगुजर यांचे काही फोटो आणि एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाशिकमधील राजकारण तापले आहे. सत्तेचा गैर वापर करुन टार्गेट करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो आहे.
12 मार्च 1993 ला मुंबईत 12 ब्लास्ट झाले होते. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही अंगावर काटा आणतात. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा खास शूटर सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याला ही कटात सहभागी असल्याने न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. या सलीम शेख सोबत उबाठा गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे मैं हूं डॉन या गाण्यावर डान्स करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संजय राऊतची पिपाणी, देशद्रोह्यांसोबत गातो गाणी. मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून दहशत माजविणाऱ्या देशद्रोह्याचे पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देतांनाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. बडगुजर यांची तातडीने चौकशी व्हावी, त्यांनी काय भेट दिले? नाशिक मध्ये काही मोठे घडवायचे नियोजन आहे का? याची चौकशी झालीच पाहिजे. 257 निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्यांचे, शिवसेना भवन उडविण्याचा कट रचणाऱ्याचे स्वागत सुधाकर बडगुजर का करत होते? त्याच्या सोबत नाचतात. हेच यांचे बेगडी हिंदुत्व आहे का? बडगुजर यांना नाशिकचे डॉन व्हायचे आहे का? ही पार्टी कुठे झाली? नाशिककरांना या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केली आहे.
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…