थकबाकीदारांविरोधात पालिका ऍक्शन  मोडवर

 

 

76 नळ कनेक्शन कापले; 30 लाखांची वसुली, 47 मिळकतधारकांना वॉरंट

 

नाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने कर वसुली विभागाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात थेट कारवाई सुरू केली आहे. दि.1 ते शुक्रवार दरम्यान सहा दिवसांत 76 नळ कनेक्शन बंद केले असून तब्बल  29 लाख 69 हजार 48 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. एकूण 241 ठिकाणी मनपाच्या पथकाने पाहणी केली. त्यातील 156 ठिकाणी वसुली करण्यात आली आहे. 57 लाख 96 हजार 471 लाख रुपयांपैकी 30 लाख रुपयांची वसुली झाली आहे.

मनपाच्या कर विभागाने सहा दिवसांमध्ये सहा विभाग मिळून एकूण 47 वॉरंट काढले आहेत. त्यातून 11 लाख 84 हजार 486 रुपयांची वसुली झाली आहे. वॉरंट बजावल्यानंतर 21 दिवसाच्या आत मिळकतधारकांनी थकबाकीचा भरणा करणे अनिवार्य आहे. अन्यथा चालू बाजारभावाप्रमाणे मिळकतीचे मुल्यांकन करुन लिलाव प्रक्रिया सुरु केली जाईल, असा इशारा मनपाच्या कर विभागाने दिला आहे.  दरम्यान थकबाकीदार, नागरिकांनी पाणीपट्टी, मालमत्ता कर त्वरित भरून नाशिक मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जे नागरिक कर भरून सहकार्य करणार नाहीत, अशा मालमत्ताधारकांचे पाण्याचे नळ कनेक्शन बंद करण्यात येईल. थकबाकी आणि चालू वर्षाचा कर त्वरित भरून मनपाला सहकार्य करावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपाच्या कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी केले आहे.

 

 

विभागनिहाय सहा दिवसांची आकडेवारी*

 

नाशिक पश्चिम

बंद केलेली नळ कनेक्शन – 81

वसुली केलेली नळ कनेक्शन संख्या – 81

थकबाकी रक्कम – 11 लाख 95 हजार

वसुली रक्कम – 10 लाख 31 हजार 419

……………………………………………………

नाशिक पूर्व

बंद केलेली नळ कनेक्शन – 8

वसुली केलेली नळ कनेक्शन संख्या – 8

थकबाकी रक्कम – 11 लाख 2% हजार %26

वसुली रक्कम – 4 लाख 108,29

…………………………………………………

पंचवटी

बंद केलेली नळ कनेक्शन – 0

वसुली केलेली नळ कनेक्शन संख्या – 19

थकबाकी रक्कम – 3 लाख 32 हजार 998

वसुली रक्कम – 2 लाख 32 हजार 662

………………………………………………………………..

नविन नाशिक

बंद केलेली नळ कनेक्शन – 28

वसुली केलेली नळ कनेक्शन संख्या – 14

थकबाकी रक्कम – 9 लाख 31 हजार 559

वसुली रक्कम – % लाख 1 हजार 242

 

…………………………………………………….

सातपूर

बंद केलेली नळ कनेक्शन – 32

वसुली केलेली नळ कनेक्शन संख्या – 28

थकबाकी रक्कम – 15 लाख 62 हजार 260

वसुली रक्कम – 5 लाख 33 हजार 906

……………………………………………….

 

नाशिक रोड

बंद केलेली नळ कनेक्शन – 8

वसुली केलेली नळ कनेक्शन संख्या – 6

थकबाकी रक्कम – 6 लाख 46 हजार 928

वसुली रक्कम – 58 हजार 990

………………………………………………………..

एकूण वसुल केलेली नळ कनेक्शन संख्या – 156

एकूण नळ कनेक्शन बंद केलेली संख्या – %6

एकूण थकबाकी रक्कम – 5% लाख 96 हजार 4%1

एकूण वसुल केलेली रक्कम- 29 लाख 69 हजार 048

 

………………………………………..

 

विभागनिहाय मालमत्ता वॉरंट संख्या

सातपूर -14

नाशिक पश्चिम -3

नाशिक पूर्व -4

नवीन नाशिक – 26

एकूण – 4%

…….

 

चौकट….

 

निमा कार्यालयाला वारंट

 

उद्योगांचे नेतृत्व करणारी नाशिक इंडस्ट्रिअल मन्युफॅक्चरींग असोसिएशन अर्थात निमा या संघटनेच्या कार्यालयाची एक लाख 27 हजार घरपट्टी थकली आहे. कर संकलन विभागाने या प्रकरणी निमा संस्थेला वारंट जारी केले असून थकबाकी भरण्यासाठी 21 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत भरणा न केल्यास  मालमत्तेचा लिलाव केला जाईल, असा इशारा दिला आहे.सातपूरमधील औद्योगिक वसाहतीचे असून अनेक नामवंत कंपन्या असून त्यांची लाखोंची मालमत्ता कर थकला आहे. त्यांना वारंवार आवाहन करुनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. अखेर करसंकलन विभागाने सातपूर विभागातील निमासह पंधरा जणांना वारंट जारी केले आहे.त्यात काही कंपन्या व काही उच्चभ्रू नागरिकांचा समावेश आहे. या पंधराजणांकडे तब्बल चाळीस लाख 87 हजार 418 इतका मालमत्ता कर थकला आहे. त्यांना दिलेल्या मुदतीत थकबाकी अदा न केल्यास मालमत्ता जप्त करुन तिचा लिलाव केला जाईल.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *