शहरात प्रशासनाकडून 10 ठिकाणी व्यवस्था
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज, मंगळवार (दि.23)पासून उमेदवारी अर्जांची विक्री व अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात होत आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने दहा ठिकाणी सोय केली आहे.
नाशिक महापालिका हद्दीत यंदा 13 लाख 60 हजार मतदार 122 नगरसेवकांचे भवितव्य ठरवणार आहेत. याकरिता सोळाशे मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करणे, अर्ज विक्रीसाठी अनामत रक्कम भरणे, निवडणुकीसाठी होणार्या खर्चाची नोंद तसेच इतर आवश्यक बाबींसाठी स्वतंत्र प्रत्येक विभागीय कार्यालयात आचारसंहिता कक्ष उभारण्यात आला आहे.
येथे असेल अर्ज स्वीकारण्याची सोय
प्रभाग क्रमांक 1, 2, 3 : पंचवटी विभागीय कार्यालय (तिसरा मजला).
प्रभाग क्रमांक 4, 5, 6 : पंचवटी विभागीय कार्यालय (तिसरा मजला).
प्रभाग क्रमांक 7, 12, 24 : नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय, पंडित कॉलनी.
प्रभाग क्रमांक 13, 14, 15 : नाशिक पूर्व विभागीय कार्यालय, मेन रोड.
प्रभाग क्रमांक 16, 23, 30 : दिव्यांग विभाग, अटल दिव्यांग स्वाभिमान भवन.
प्रभाग क्रमांक 17, 18, 19 : नाशिकरोड विभागीय कार्यालय, दुर्गा गार्डनशेजारी, नाशिकरोड
प्रभाग क्रमांक 20, 21, 22 : नाशिकरोड विभागीय कार्यालय, दुर्गा गार्डनशेजारी, नाशिकरोड
प्रभाग क्रमांक 25, 26, 28 : सिडको विभागीय कार्यालय, अंबड पोलीस स्टेशनसमोर, सिडको, अंबड.
प्रभाग क्रमांक 27, 29, 31 : सिडको विभागीय कार्यालय, अंबड पोलिस स्टेशनसमोर, सिडको, अंबड.
प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 : सातपूर विभागीय कार्यालय, त्र्यंबकरोड.
Municipal Corporation Randhumali; Application submission starts today