नाशिक

पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्ताव मनपा तयार करणार

402 कोटींचा खर्च : सिंहस्थात येणार्‍या भाविकांसाठी निर्णय

नाशिक : प्रतिनिधी
विल्होळी येथील 274 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दुरुस्ती सुचवण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास 402 कोटींचा सुधारित प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात दहा कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. शहरात दाखल होणार्‍या भाविकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच 2036 पर्यंतच्या लोकसंख्येला पुरेल या दृष्टीने विल्होळी येथील जलशुद्धीकरणाची क्षमता वाढविण्यात येणार आहे. गंगापूर धरण हे गाळाने भरले असल्यामुळे येथून अतिरिक्त पाणीपुरवठा होऊ शकत नाही. दारणा धरणामधून थेट जलवाहिनी नसल्यामुळे पाणी आणण्यात अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर मुकणे पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करणे महत्त्वाचे आहे. विल्होळी येथे 274 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र पालिकेने प्रस्तावित केले आहे. त्यासाठी 409 कोटींचा खर्च आहे. या प्रस्तावाला मनपाने मान्यता दिली असली तरी अलीकडेच जीवन प्राधिकरणाने या प्रस्तावात दुरुस्ती सुचवली.
शहराला सद्यस्थितीमध्ये 6200 दशलक्ष घनफूट पाणी वर्षासाठी लागते. गंगापूर धरणातून 4500 दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून 200 तर मुकणे धरणातून 1500 दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण विल्होळी येथे 274 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणी तसेच या जलशुद्धीकरण केंद्रातून साधुग्रामपर्यंत मुख्य गुरुत्ववाहिनी अर्थात थेट जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.  दररोज 20.20 दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा तिन्ही धरणांतून केला जातो. दरम्यान, पुढील 2 वर्षांमध्ये कुंभमेळा होणार असून, पर्वणी काळातील येणार्‍यांना पाण्याची सोय करण्याची जबाबदारी पालिकेची असणार आहे. त्यामुळे अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 403 कोटींच्या या योजनेसाठी शासनाच्या नगरोत्थान अभियानातून 50 टके निधी अनुदान स्वरूपात महापालिकेला मिळणार आहे. तर उर्वरित पन्नास टक्के खर्च करण्याचे आव्हान महापालिकेसमोर असेल.

Gavkari Admin

Recent Posts

गोदावरीची महाआरती 200 युवा सैनिकांच्या हस्ते

नाशिक ः प्रतिनिधी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे होणार्‍या गोदावरी महाआरतीस…

7 hours ago

विभागात पॉलिटेक्निकच्या 24,680, आयटीआयच्या 15,224 जागा

नाशिक ः प्रतिनिधी इयत्ता दहावीचा राज्य शिक्षण मंडळासह सीबीएसईचाही निकाल जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचा…

8 hours ago

पाथर्डीत अवकाळी पावसामुळे गटारी तुंबल्या

सुदाम डेमसे यांच्या मध्यस्थीने तत्काळ कार्यवाही सिडको : विशेष प्रतिनिधी प्रभाग 31 पाथर्डी परिसरात झालेल्या…

8 hours ago

पावसाळ्यापूर्वी धरणांमधील गाळ काढा

जि. प. सीईओ मित्तल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण, तलावांतून…

8 hours ago

पाइपलाइनसाठी तीनशे झाडांवर कुर्‍हाड!

वृक्षप्रेमींकडून विरोध होण्याची शक्यता नाशिक : प्रतिनिधी जुन्या जलवाहिनीची वारंवार गळती होत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी…

8 hours ago

चेतनानगरमध्ये गाडीची काच फोडून मुद्देमाल लंपास

सिडको : चेतनानगरमधील बाजीराव आव्हाड चौक परिसरात पार्क केलेल्या क्रेटा गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्याने…

8 hours ago