नाशिक

कर्जरोख्यांतून मनपा उभारणार 400 कोटी

सीए, तज्ज्ञ सल्लागारासह कायदेतज्ज्ञही नेमणार

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका प्रशासनाने आपला वाट्याचा हिस्सा देण्यासाठी मागील काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. यासाठी दोनशे कोटींचे नियमित म्युनिसिपल बॉण्ड (कर्जरोखे) व दोनशे कोटींचे ग्रीन बॉण्ड (कर्जरोखे) उभारले जात आहेत. या प्रक्रियेसाठी महापालिकेने तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एका कॅपिटल बँकर संस्थेवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबतच स्वतंत्र सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट), कायदेशीर सल्लागार (लीगल अ‍ॅडव्हायझर) यांचीही नेमणूक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याकरिता 40 लाखांचा खर्च येणार आहे.
येत्या दोन वर्षांनी शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेकडून व्यापक नियोजन सुरू करण्यात आले आहे. मनपाने आपला हिस्सा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 200 कोटी रुपये ग्रीन बॉण्ड उभारत आहेत. या रकमेतून मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन प्रकल्पासह इतर पायाभूत सोयीसुविधांची उभारणी केली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात आणखी 200 कोटींच्या बॉण्डद्वारे रस्ते, पाणी, मलनिस्सारण, प्रकाशव्यवस्था या विकासकामांसाठी खर्च करेल.
सिंहस्थाच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पायाभूत सुविधा उभारणे ही जबाबदारी शासनावर आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामे होणार असून, त्यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी महापालिकेने आता वित्तीय नियोजनाचा मार्ग अवलंबला आहे. कुंभमेळ्यासाठी 25 टक्के वाटा महापालिकेचा असणार आहे. त्यासाठी मनपा निधी उभारून ठेवत आहे. शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नाशिकमध्ये प्रथमच ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारणी होत आहे.

मनपाकडून उभारण्यात येणार्‍या 400
कोटींच्या कर्जरोख्यांची प्रक्रिया सुरू आहे. विशेष तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक झाली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार काम सुरू आहे.
– दत्तात्रय पाथरूट, मुख्य लेखाधिकारी, मनपा

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago