नाशिक

महापालिकेचे तीन हजार कोटींचे अंदाजपत्रक

नाशिककरांची यंदाही करवाढीतून सुटका; शहरासाठी कोणताही नवीन प्रकल्प नाही

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेने सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे तीन हजार 11.85 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी (दि. 2 मार्च) सादर केले. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांना हे अंदाजपत्रक सादर केले. दरम्यान, यंदा नाशिककरांवर कुठलीही करवाढ, दरवाढ केलेली नाही; परंतु शहरासाठी कुठल्याही नव्या योजनेची घोषणा केलेली नाही. यंदाही उत्पन्नाचे कुठलेही नवीन स्रोेत नसल्याने मालमत्ता कर व विकास शुल्कातून मिळणार्‍या उत्पन्नावरच अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान, या अंदाजपत्रकाद्वारे जुन्याच योजनांना मुलामा दिल्याचे चित्र आहे.
स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेले हे अंदाजपत्रक आयुक्त मनीषा खत्री यांनी मांडले. नगरसचिव मदन हरिश्चंद्र यांनी सभेचे कामकाज सुरू केले. नाशिक महापालिकेचे 34 वे अंदाजपत्रक सादर केले गेले. या अंदाजपत्रकाद्वारे नाशिककरांवर करवाढीचा बोझा टळला आहे. अंदाजपत्रकातून शहराला नवीन काय मिळणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष होते. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही नवीन योजना किंवा प्रकल्पाची घोषणा केली नाही. महापालिकेचे उत्पन्न कसे वाढणार यावर अंदाजपत्रकात काहीही भाष्य नाही. त्यासाठी कोणतेही नियोजन केलेले दिसले नाही. मालमत्ता कर, जीएसटी आणि बांधकाम विकास शुल्क हे पारंपरिक आर्थिक स्रोेत सक्षम करून त्यातून उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. पायाभूत सुविधा, मलवाहिका, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे.

मनपा आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यावर येत्या दोन-चार दिवसांत स्थायी समितीची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. स्थायी सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. या अंदाजपत्रकाद्वारे शहराच्या विकासाला चालना कशी मिळेल, हा आमचा प्रयत्न आहे.
– मच्छिंद्र सानप, सभापती, स्थायी समिती

अंदाजपत्रकाची वैशिष्टये

437 कोटींची नवीन विकासकामे.
2026-27 आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टीचे 393.17 कोटींचे टार्गेट.
शिक्षण विभागाकरिता 24 कोटी. गतवर्षी 4 कोटींचीच तरतूद.
बांधकाम विभागासाठी यंदा 471 कोटी.
रस्ते सुरक्षा जनजागृतीसाथी 17 कोटी.
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी 194 कोटी.
विद्युत व यांत्रिकी व्यवस्थापन 137.71 कोटी,
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन 40.44 कोटी.
घनकचरा व्यवस्थापन 194.90 कोटी.
समाजकल्याण विभाग 126 कोटी.
नगरनियोजन व्यवस्थापन 116 कोटी.

Municipal Corporation’s budget of three thousand crores

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago