अनधिकृत टपरीधारकांवर कारवाई; व्यावसायिकांचा तीव्र विरोध
पंचवटी : प्रतिनिधी
मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंडाकडे जाणार्या मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपरीधारकांवर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी कारवाई केली.
या कारवाईदरम्यान टपरीधारक व हॉकर्स यांनी तीव्र विरोध केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिक्रमण कारवाईस विरोध करताना टपरीधारकांनी, ‘प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना आणि कोणतीही लेखी नोटीस न देता थेट कारवाई कशी?’ असा सवाल उपस्थित केला. अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
या अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त संगीता नांदुरकर, नगररचना विभागाचे संतोष जोपळे, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, पंचवटी विभागातील अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी असा एकूण 46 कर्मचार्यांचा ताफा उपस्थित होता. संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांसह मनपा सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. कारवाई सुरू असतानाच टपरीधारक व हॉकर्स यांनी विरोध दर्शविल्याने मनपा प्रशासन आणि व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वाद झाले. या कारवाईमुळे शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा येणार असल्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली. अनेक कुटुंबे गेली सुमारे साठ वर्षे याच परिसरात व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहे. त्यांचे पुनर्वसन, पर्यायी व्यवस्था व कायदेशीर प्रक्रिया याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने नाराजी वाढली आहे.
दरम्यान, मनपाकडून अतिक्रमण हटविणे आवश्यक असून, टपरीधारकांना सहा फूट बाय सहा फूट मोजणीची नियोजनबद्ध व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मात्र, याबाबत व्यवसायिक समाधानी नसून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा दावा त्यांनी केला. संकटाच्या काळात प्रभागातील एकही लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक आमच्या पाठीशी उभा राहिला नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली.ही कारवाई कायम स्वरूपाची असून, अतिक्रमण हटविण्याबाबत सहकार्य करावे, तसेच व्यावसायिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे.
Municipal Corporation’s encroachment department campaign in Ramkund area
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…