नाशिक

रामकुंड परिसरात मनपाच्या अतिक्रमण विभागाची मोहीम

अनधिकृत टपरीधारकांवर कारवाई; व्यावसायिकांचा तीव्र विरोध

पंचवटी : प्रतिनिधी
मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंडाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपरीधारकांवर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी कारवाई केली.
या कारवाईदरम्यान टपरीधारक व हॉकर्स यांनी तीव्र विरोध केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिक्रमण कारवाईस विरोध करताना टपरीधारकांनी, ‘प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना आणि कोणतीही लेखी नोटीस न देता थेट कारवाई कशी?’ असा सवाल उपस्थित केला. अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
या अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त संगीता नांदुरकर, नगररचना विभागाचे संतोष जोपळे, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, पंचवटी विभागातील अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी असा एकूण 46 कर्मचार्‍यांचा ताफा उपस्थित होता. संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांसह मनपा सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. कारवाई सुरू असतानाच टपरीधारक व हॉकर्स यांनी विरोध दर्शविल्याने मनपा प्रशासन आणि व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वाद झाले. या कारवाईमुळे शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा येणार असल्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली. अनेक कुटुंबे गेली सुमारे साठ वर्षे याच परिसरात व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहे. त्यांचे पुनर्वसन, पर्यायी व्यवस्था व कायदेशीर प्रक्रिया याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने नाराजी वाढली आहे.
दरम्यान, मनपाकडून अतिक्रमण हटविणे आवश्यक असून, टपरीधारकांना सहा फूट बाय सहा फूट मोजणीची नियोजनबद्ध व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मात्र, याबाबत व्यवसायिक समाधानी नसून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा दावा त्यांनी केला. संकटाच्या काळात प्रभागातील एकही लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक आमच्या पाठीशी उभा राहिला नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली.ही कारवाई कायम स्वरूपाची असून, अतिक्रमण हटविण्याबाबत सहकार्य करावे, तसेच व्यावसायिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे.

 

Municipal Corporation’s encroachment department campaign in Ramkund area

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago