25 मार्चपर्यंत उपक्रम राहणार सुरू
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, शाळाबाह्य व गळती विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, तसेच शंभर टक्के प्रवेश उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 1 मार्चपासून पटनोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान 25 मार्चपर्यंत राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत शहरातील विविध केंद्रांंतर्गत येणार्या
महापालिका शाळांमध्ये मोठ्या उत्साहात जनजागृती व पटनोंदणी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या-त्या परिसरातील केंद्रप्रमुख व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. या अभियानाचे नियोजन, जनजागृती उपक्रम व पटनोंदणीची संपूर्ण कार्यवाही त्यांच्या समन्वयातून करण्यात येत आहे. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्त्या, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने परिसरनिहाय नियोजन करून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
या अभियानादरम्यान प्रभातफेरी, घोषणा मोहीम, घरभेटी, पालक सभा, विद्याथ्यार्ंमधील कलागुणांचे सादरीकरण यांसारखे उपक्रम राबवून पालकांना आपल्या मुलांना मनपा शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. तसेच शाळांमधील स्मार्ट स्कूल, सुसज्ज संगणक लॅब, स्मार्ट बोर्ड, शासनमान्य ई-अभ्यासक्रमावर आधारित कृतियुक्त शिक्षण, हाउसेस व क्लब उपक्रम, मानसिक आरोग्य कार्यक्रम, पोलीस काका-दीदी उपक्रम, आनंददायी शनिवार, शैक्षणिक क्षेत्रभेटी (तारांगण, ट्रॅफिक पार्क, मनपा प्रकल्प), प्रकल्प जिज्ञासा, टिंकरिंग लॅब, वाचन उपक्रम, स्पेलिंग बी स्पर्धा, इस्रो सहल, डिमार्टचे ग्रंथालय व संगणक लॅब, याशिवाय पाचवी, आठवी व एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षण, क्रीडा महोत्सव व दिव्यांग क्रीडा उत्सव, मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येतात.
मनपा शाळांचे मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतील यश, तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश, सुरक्षित व सुसज्ज शाळा इमारत, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षारक्षक, शैक्षणिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत पालकांना सविस्तर माहिती दिली जात आहे. याशिवाय एक शिक्षक- दहा विद्यार्थी दत्तक योजना, विद्यार्थी राजदूत उपक्रम तसेच नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे पदाधिकारी व अधिकार्यांच्या उपस्थितीत स्वागत असे प्रेरणादायी उपक्रमही राबविण्यात येत आहेत. 100 टक्के प्रवेश साध्य करणार्या शाळा व शिक्षकांचा शिक्षण विभागामार्फत गौरव करण्यात येणार आहे.
शहरातील मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मुलांचा प्रवेश करून पटनोंदणी अभियानाला सहकार्य करावे. महापालिका शाळांत
दर्जेदार शिक्षणासोबतच डिजिटल सुविधा, क्रीडा, संस्कार व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम उपलब्ध असल्याने पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
-डॉ. मिता चौधरी, प्रशासनाधिकारी, मनपा
शहरात अभियानांतर्गत येथे जनजागृती
या अभियानांतर्गत गोदाघाट, चिंचबन, मधुबन कॉलनी, मखमलाबाद गाव, हरीभाई चाळ, निमाणी परिसर, मार्केट यार्ड, क्षीरसागर चाळ, संजयनगर, एरंडवाडी, भक्तिधाम परिसर, हुंडीवाला लेन, फुलेनगर, तारावालानगर झोपडपट्टी, मायको दवाखाना परिसर, देवळालीगाव, विहितगाव, सिन्नर फाटा, गोरेवाडी, चाडेगाव, रेल्वे स्टेशन परिसर, राजवाडा, चेहेडी, वडनेर दुमाला, पाथर्डी गाव, प्रशांतनगर, वाडीचेरान परिसर, मुलतानीपुरा, नागझरी, झारेकरी कोट, दूध बाजार, स्वारबाबानगर, भारतनगर, अमरधाम परिसर, अंबड, चुंचाळे, दत्तनगर, कामटवाडे, घरकुल, कामगारनगर, पाइपलाइन रोड, शिवाजीनगर, राधाकृष्णनगर, ध्रुवनगर, श्रमिकनगर, विश्वासनगर, पिंपळगाव बहुला, रायगड चौक, तोरणानगर, पवननगर, सातपूर कॉलनी, महादेववाडी, भाजी मार्केट सातपूर परिसर, आयटीआय सिग्नल ते राजवाडा परिसर, आनंदवली, संत कबीर नगर, गंगापूर गाव, गणेश चौक, मोरवाडी झोपडपट्टी परिसर, महाराणा प्रताप चौक, अमृतधाम, विडी कामगार कॉलनी, निलगिरी बाग, आडगाव, म्हसरूळ, बोरगड, नांदूर, मानूर, गणेशवाडी, पवार मळा, जेतवननगर झोपडपट्टी, नेहरूनगर, मुक्तिधाम परिसर, वडाळागाव, घरकुल योजना, पंचक, दसक, जेल टाकी, उपनगर परिसर, इंगळेनगर, भगवा चौक व इंदिरा गांधी झोपडपट्टी, अशा अनेक भागांत शिक्षकांकडून घरभेटी व जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात येत आहे.
Municipal Corporation’s registration, door-to-door visit campaign
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…