नाशिक

मनपाचे दुरूस्तीचे काम : नागरिकांचे पाण्यावाचून हाल

शहरात आजही येणार कमी दाबाने पाणी

नाशिक : प्रतिनिधी
शहरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाइपलाइन दुरुस्तीचे काम रविवारी हाती घेतले होते. मात्र, यामुळे नागरिकांचे हाल झाल्याचे दिसून आले. दरम्यान, सोमवारीदेखील सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांना पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.

महानगरपालिका हद्दीतील सातपूर विभागात 1200 मि.मी. व्यासाच्या कच्च्या पाण्याच्या मुख्य पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती थांबविण्याचे काम रविवारी (दि. 4) उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. गंगापूर डॅमवरील पंपिंगच बंद असल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी घरगुती वापरासाठी पाण्याची मोठी गरज असते. मात्र, याच वेळेत पाणी उपलब्ध नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुक्त विद्यापीठ गेट परिसरात ही गळती थांबविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात रविवारी तर पाणी आलेच नाही, परंतु सोमवारी (दि. 5) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मनपाकडून मिळाली आहे. 1200 मि.मी. व्यासाच्या कच्च्या पाण्याची मुख्य पाइपलाइनद्वारे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड तसेच सिडकोतील काही भागांना पाणीपुरवठा होतो. या कामामुळे सोमवारी दुपारचा पाणीपुरवठा नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड व सिडकोतील पवननगर जलकुंभावरून वितरण होणार्‍या भागात बंद राहणार आहे.

अत्यावश्यक व तातडीची दुरुस्ती नागरिकांच्या हितासाठी करण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून मनपाला सहकार्य करावे. मुक्त विद्यापीठ परिसरात जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. कामास उशीर लागू शकतो.
-रवींद्र धारणकर,अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

Municipal Corporation’s repair work: Citizens’ plight without water

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago