नाशिक : गोरख काळे
नाशिक महानगरपालिकेची निवडणूक वेळेत न होऊ शकल्याने मार्च 2022 पासून नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट आहे. पुढच्या महिन्यात या प्रशासक राजवटीची वर्षपूर्ती होणार आहे. दरम्यान न्यायालयात ओबीसी आरक्षण व प्रभाग रचना याववर सुनावणी सुरु असल्याने अद्याप याप्रकरणी निवडणुकीवर अंतिम निर्णय येऊ शकलेला नाही. त्यामुळे निवडणुका कधी होणार हे अद्यापही स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान नाशिक महापालिकेसह उर्वरित पालिकेच्या निवडणुका थेट पुढच्या वर्षी होतील. अशा जोरदार चर्चा नाशिकच्या राजकारणात सुरु आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबइ महापालिकेसाठी एक सदस्य वार्ड रचना तर नाशिकसह उर्वरीत सर्व महापालिकांसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली. निवडणुकांना विलंब होत असल्याचे पाहत मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची सूचना केली होती. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी म्हटलं होतं. परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकारने वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या. शिंदे सरकारने 201% प्रमानेच चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाला महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला. न्यायालयात याचिका दाखल झाली असून त्यावर अद्यापही अंतिम निर्णय आलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांचा मात्र दिवसेंदिवस निवडणुका लांबत चाललाने चलबीचल होत आहे. मार्च महिन्यात या निवडणुका होणे अपेक्षित होते परंतु सुरुवातीला कोरोनाचे सावट आणि नंतर ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. निवडणुका वेळेत होतील यासाठी इच्छुक उमेदवारांनी गेल्या कित्येक दिवसापासून मोर्चे बांधणी करून प्रभागांमध्ये जनसंपर्क सुरू केला होता. लाखो रुपये खर्च करून अनेकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. ही सर्व तयारी त्री सदस्य प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर करण्यात आली. प्रशासनाने आरक्षन सोडत, मतदार यादीची प्रसिद्ध केली. यानंतर पालिका निवडणूक कधीही होउ शकेल. असे चित्र गेल्या वर्षीचे होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. सध्या निवडणुकीसंदर्भात कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाहीये. त्यातच आता दहावी व बारावी ची परीक्षा असल्याने पुढया एक दोन महिन्यात निवड्णुकीची कोणतीही सूतमार शक्यता नाही. त्यामुळे ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात नाहीतर थेट पुढील वर्षी 2024 मध्ये निवडणुक होतील अशी चर्चा सर्वच पक्षीयांच्या पदाधिकार्यांमध्ये होताना दिसते आहे.