समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाईचा इशारा
नाशिक : प्रतिनिधी
शासनाच्या आदेशानुसार महापालिका आरोग्य विभागाने शहरातील सर्व रुग्णालयात नर्सिंग होम ऍक्टनुसार रुग्ण हक्क सनद जाहीर करणे बंधनकारक केले आहे. रुग्णालयांमध्ये उपचार दरपत्रक फलक लावणे सक्तीचे आहे. मात्र, या निर्णयाकडे काही रुग्णालये सपशेल दुर्लक्ष करून केराची टोपली दाखवत आहे. दरम्यान, याच प्रकरणी आता सह्याद्री रुग्णालयास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी सह्याद्री रुग्णालयास दणका देत थेट कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच यावर समाधानकारक उत्तर न आल्यास या रुग्णालयावर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
असेन मी नसेन मी… सोशल मीडियातून दिसेन मी !
रुग्णहक्क सनद जाहीर न करणे, महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेचा प्रसिद्धी फलक लावलेला नव्हता. तसेच तक्रार निवारण कक्षही अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेने सह्याद्री रुग्णालयास हा झटका दिला. अतिरिक्त आयुक्त आत्राम यांनी गुरुवारी (दि.22) अचानक सह्याद्री हॉस्पिटलला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांना वरील बाबी आढळून आल्या नाही.
व्यसनमुक्ती केंद्राचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न
शासनामार्फत राबविण्यात येणारी महात्मा जोेतिबा फुले जीवनदायनी योजनेचे प्रसिद्धिपत्रक लावावे जेणेकरून आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या रुग्णांना माहिती मिळेल, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र, बहुतांश रुग्णालयांकडून या नियमांची पायमल्ली होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे त्यात वरील नियमांची पूर्तता होत नसल्याचे आढळले.
बांधकाम व्यवसायिकांच्या सहकार्याने नाशिकचा विकास
त्यामुळे महापालिका आरोग्य विभागामार्फत हॉस्पिटल प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी तत्काळ खुलासा मागविण्यात आला असून, समाधानकारक उत्तर नसल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाकाळात
रुग्णांची लूटमार
कोरोनाकाळात रुग्णांची काहींनी आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप कारण्यात आले होते. अव्वाचा सव्वा बिल आकारण्यावरून रुग्णालय प्रशासन व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात अनेकदा वाददेखील झाले. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार महापालिका आरोग्य विभागाने शहरातील सर्व रुग्णालयांत नर्सिंग होम ऍक्टनुसार रुग्णहक्क सनद जाहीर करणे बंधनकारक केले आहे. रुग्णालयांमध्ये उपचार दरपत्रक फलक लावणे सक्तीचे आहे.
अमरावतीत खून करून पळला नाशकात सापडला
खासगी रुग्णालयांना अचानक भेटी
शहरातील काही खासगी रुग्णालये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कसलेच पालन करत नाही. त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका रुग्ण व त्याच्या नातेवाइकांना बसतो. हीच बाब लक्षात घेत आता शहरातील खासगी रुग्णालयांना अतिरिक्त आयुक्त अचानक भेटी देणार आहेत. यावेळी नियमांचे उल्लंघन होत नाही ना, याची तपासणी करणार आहे. उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
नियमांचे उल्लंघन
येत्या काळात शहरातील विविध रुग्णालयांना भेट देणार असून, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोेर कारवाई केली जाईल. गुरुवारी सह्याद्री हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी महाराष्ट्र नर्सिंग होम ऍक्टचे पालन होत नसल्याचे समोर आले. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास आणि त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करून कारवाई केली जाऊ शकते.
– अशोक आत्राम, अतिरिक्त आयुक्त, महापालिका