नाशिक

मनपाचे पथक बदलापुरात जाणार

स्त्रीबीज तस्करी प्रकरण

नाशिक : प्रतिनिधी
बदलापूर येथे स्त्रीबीज तस्करीचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे धागेदोरे नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील मालती आयव्हीएफ सेंटरमध्ये येऊन सापडले होते. त्यानंतर नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सदर सेंटर बंद करत सील केले होते. दरम्यान, याबाबतचा तपास करण्यासाठी मनपाचे वैद्यकीय पथक बदलापूरला रवाना होणार आहे.
दरम्यान, स्त्रीबीज तस्करीप्रकरणी डॉ. अमोल पाटील यांना आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिकमधील मालती आयव्हीएफ केंद्रातून महिलांकडून स्त्रीबीज घेतल्याचा अधिकचा तपास करण्यासाठी मनपाचे पथक बदलापूर ला लवकरच जाणार आहे. यापूर्वी या सेंटरमधून 96 महिलांनी स्त्रीबीज दिल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याबाबतचा सखोल तपास आरोग्य विभाग करत आहे. महापालिकेने तपासासाठी बदलापूर येथील संबंधित केंद्रातील महिलांची नावे मागवली होती. बदलापूर व नाशिक या दोन्ही ठिकाणच्या नावांमध्ये साम्य आहे का, किंवा नाशिकमधील काही महिला बदलापूर केंद्रातही गेल्या होत्या का, याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेचे पथक बदलापूरला भेट देणार आहे. बदलापूर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. नाशिक महापालिका, ठाणे महापालिका आणि पोलिसांचे संयुक्त पथक तपास करत आहे.

बदलापूर केंद्रातील महिलांची नावे आणि नाशिकच्या मालती सेंटरमधील नावे यात संबंध आहे का? याची पडताळणीसाठी नाशिक महापालिकेचे पथक लवकरच बदलापूरला जाणार आहे.
– डॉ. विजयकुमार देवकर, मुख्य आरोग्य अधिकारी, मनपा

 

Municipal team will go to Badlapur

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago