नगरपालिका, नगरपंचायतींचे बिगुल वाजले आजपासून आचारसंहिता, 2 डिसेंबर रोजी मतदान

नगरपालिका, नगरपंचायतींचे बिगुल वाजले
आजपासून आचारसंहिता, 2 डिसेंबर रोजी मतदान
मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. न्यायालयाने 31 जानेवारीच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता पहिल्या टप्यात नगरपालिका नंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होतील असे सांगण्यात येत होते. काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.  राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
एकूण किती मतदार?
एकूण मतदार – 1 कोटी 7 लाख 3 हजार 576
महिला मतदार – 53 लाख 22 हजार 870

सात हजार खर्च

निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा तर नगरसेवकपदासाठी 7 लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *