आयुक्तांचे विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश
नाशिक : प्रतिनिधी
अशोकस्तंभ येथील वाड्यालाा कारने दिलेल्या धडकेत वाडा कोसळल्याची घटना नुकतीच घडेली. या घटनेनंतर शहरातील जुन्या व धोकेदायक वाडयांचा प्रश्न समोर आला आहे. पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वाडयांचे प्रकरण गांभीर्याने घेतले असून याबाबत त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना कारवाइच्या सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी नाशिक महानगरपालिकेने जुने व जिर्ण आणि धोकेदायक वाडयांना 1186 वाडयांना नोटीसा धाडल्या होत्या. परंतू या नोटीसा देउन पुढे काहीही होउ शकले नाही.
शहरातील पूर्व विभागात बहुतांश वाडे धोकेदायक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून एप्रिल व मे महिन्यात नोटीसा बजावल्या जात्या. मात्र या नोटीसांना संबंधित वाड्यातील रहिवाशी जुमानत नाही. ज्यांनी नोटीसा धाडूनही वाडे खाली केले नाहीतर त्या विभागातील विभागीय अधिकाऱ्यांना संबंधितांचे पाणी व वीज कनेक्शन तोडण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र विभागीय अधिकाऱ्यांनी त्याकडे दूर्ऱ्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. मात्र आता आयुकांनी पुन्हा याप्रकरणी पत्र काढत धोकेदायक वाडयांवर कारवाइच्या सूचना केल्या आहेत. पावसाळ्यात कोणतीही जिवीतहानी होउ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी सहा विभागात धोकेदायक वाडे खाली करण्यासाठी मोहिम राबवली जाते. प्रत्येक वर्षी वाडेतील रहिवाशी किंवा भाडेकरु वाडा खाली करत नसल्याचे चित्र आहे. अनेकठिकाणी वाडा मालक व भाडेकरु यांच्यात वाद असल्याने भाडेकरुन वाडा खाली करत नाहीत. दरम्यान अशोकस्तंभ येथे वाहनाच्या धडकेत वाडा कोसळ्ल्याने महापालिका पुन्हा एकदा जागी झाली असून धोकेदायक वाड्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना कारवाइच्या सूचना दिल्याचे बोलले जाते आहे. मात्र आता त्यास वाडेधारक कसा प्रतिसाद देतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
विभागीय अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका
यापूर्वी धोकेदायक वाड्यांना नोटीसा बजावल्यानंतरही कोणी वाडा खाली करत नसेल तर संबंधित विभागीय अधिकारी ते त्या वाड्यातील पाणी तोडणे, वीज तोडणे हे पर्याय अवलंबू शकतात. प्रसंगी पोलिसांच्या मदतीने वाडा ते खाली करु शकतात. असे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र याप्रकरणी विभागीय अधिकाऱ्यांकडून बघ्याची भूमिका असल्याचे समोर आले आहे.