इंदिरानगर| वार्ताहर | कौटुंबिक वादातून पत्नीने पतीचा खून केल्याची घटना वडाळा येथे घडली. खून करून मृतदेह पलंगाखाली लपवून पत्नीने पोबारा केला आहे.रंगनाथ कदम, वय ५५ वर्षे रा. हनुमान मंदिराजवळ, माळी गल्ली, वडाळा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा येथे एका इसमाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. पती – पत्नीच्या वादातून खून झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. पत्नीने खून करून पलंगाखाली मृतदेह लपवून ठेवला. संध्याकाळी मुलगा कामावरून घरी परतल्यावर त्याला पलंगाखाली वडिलांचा मृतदेह आढळला.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खून करून महिला पळून गेली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.