इंदिरानगर: प्रतिनिधी
कंपनीच्या मॅनेजरवर धारदार शस्रने वार केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कंपनी मॅनेजर चा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. योगेश मोगरे हे कंपनीचे काम उरकून काल रात्री आपल्या कारने घरी जात असताना पाथर्डी फाटा भागात अज्ञात तीन हल्लेखोरांनी कार अडवून मोगरे यांच्यावर धारदार शास्रने वार केले, त्यानंतर कार घेऊन पसार झाले होते, गंभीर जखमी झालेल्या मोगरे यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हल्लेखोर यांच्या शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने पथके तयार केली आहेत,
गेल्या काहीं दिवसापासून गुन्हेगारी ने कळस गाठला आहे, कोयता गॅंग, हाणामारी, जीवघेणे हल्ले, वाहनांची तोडफोड या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पोलीस उपायुक्त खांडवी यांनी भेट देत तपासाबाबत सूचना केल्या.