येवला : प्रतिनिधी
किरकोळ कारणावरुन मद्यपी मुलाचा पित्याने मुलाचे डोके दगडावर आपटून खून केल्याची घटना येवला तालुक्यातील कातरणी येथे घडली. संदीप बाळासाहेब आगवण (32) असे मयत मुलाचे नाव आहे या प्रकरणी आरोपी वडील बाळासाहेब आगवण राहणार कातरणी ता. येवला यांस पोलिसांनी अटक केली आहे. संदीप यास दारू पिण्याचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वी संदीपची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. पहाटे चारच्या दरम्यान संदीप हा दारू पिऊन आला आणि वडील बाळासाहेब आगवण यांच्याशी भांडू लागला. तुम्ही माझा विवाह चांगल्या मुलीशी करून दिला नाही. यावरुन दोघांत जोरदार बाचाबाची होऊन हाणामारी झाली. वडील बाळासाहेब आगवण यांनी मुलगा संदीप यास आगवण यास उचलून डोक्यावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी येवला तालुका पोलिस ठाण्यात आरोपी पिता बाळासाहेब आगवण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे करीत आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…