नाशिक

मद्यपी जावयाच्या हल्ल्यात सासू ठार

पत्नी व मुलगी गंभीर जखमी, इगतपुरी तालुक्यातील घटना

इगतपुरी : प्रतिनिधी
नवर्‍यास दारूचे व्यसन असल्याने पत्नी सासरी येण्यास टाळाटाळ करत होती. त्या कारणावरून पत्नीच्या माहेरी काल सकाळी दोघा पती-पत्नीत शाब्दिक बाचाबाची झाली. याच दरम्यान रागाच्या भरात पतीने विळ्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान त्याची सासू व अल्पवयीन मुलगी सोडविण्यास गेले असता, त्यांच्यावरही हल्ला चढविला व या घटनेत जावयाने सासूच्या पोटात व पाठीत कात्री भोसकल्याने सासू जागीच गतप्राण झाली. पत्नी व अल्पवयीन मुलगी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घोटी पोलिसांनी ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या संशयित खुनी जावयास ताब्यात देऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या झारवड जोशीवाडी येथील ही घटना असून, काल सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. यात कमळाबाई सोमा भुतांबरे (55, रा. जोशीवाडी झारवड, ता. त्र्यंबकेश्‍वर) ही महिला या घटनेत जागीच ठार झाली. इंदुबाई किसन पारधी (36, रा. कळमुस्ते, जांभूळवाडी, ता. त्र्यंबकेश्‍वर)ही विवाहित महिला आपली 12 वर्षीय मुलगी माधुरी हिस सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी माहेरी झारवड येथे आली होती. दरम्यान, पतीला दारूचे व्यसन असल्याने ती सासरी जाण्यास टाळाटाळ करत होती. सासरी आलेला जावई सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास पत्नीला घरी येण्याबाबत आग्रह करू लागला. याचदरम्यान पत्नी स्वयंपाक करत असताना नवरा-बायकोमध्ये भांडण झाले. यात नवरा किसन महादू पारधी (42, रा. कळमुस्ते जांभूळवाडी, ता. त्र्यंबकेश्‍वर) हा विळ्याने पत्नी इंदुबाई हिस मारहाण करत होता. यादरम्यान सासू कमळाबाई व मुलगी माधुरी या भांडण सोडविण्यास गेल्या असता, किसन पारधी याने कमळाबाई यांच्या पोटात व पाठीवर कात्रीने भोसकून जागीच ठार मारले.
या घटनेबाबत आरडाओरड होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन संशयित किसन महादू पारधी यास पकडून ठेवले व घोटी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. जखमी अवस्थेत पडलेल्या इंदुबाई व माधुरी यांना तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची व परिस्थितीची माहिती घेऊन तपासाकामी सूचना दिल्या. घोटी पोलिसांनी बाळा निवृत्ती भुतांबरे (वय 27) यांच्या फिर्यादीवरून संशयित किसन महादू पारधी याच्याविरुद्ध खून, जीवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास यांच्यासह हवालदार कोरडे, शीतल गायकवाड, रवी जगताप सदगीर आदी करीत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago