नाशिक: प्रतिनिधी
शहरात गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही. चुंचाळे येथे घरात घुसून एका रिक्षा चालक युवकास टोळक्याने घरात घुसून लोखंडी गजाने बेदम मारहाण केली, यात या रिक्षचालक युवकाचा मृत्यू झाला. शंकर आडांगळे असे या युवकाचे नाव आहे. त्याला रात्री तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, मात्र प्राणज्योत मालवली, गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी ने डोके वर काढले आहेत. गुन्हेगारी कमी होण्यासाठी अनेक प्रयोग आयुक्तांनी केले, दर दोन तीन महिन्यांनी पोलीस निरीक्षक बदलला जातो, कोयत्यासह गाड्या फोडणे, हाणामारी हे प्रकार नित्याचे झाले आहे,