सिडको: दिलीपराज सोनार
: अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनापाठोपाठ उपनगर पोलीस ठाण्याच्या हदेदातीव अंबेडकर वाडी येथे दोघा सख्या भावांचा टोकळ्यांकडुन धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव असे खुन झालेल्या दोघा सख्या भावांचे नावे आहेत या घटनेमुळे शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगरजवळील आंबेडकरवाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर घडली.
अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान याघटनेमुळे रंगपंचमीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असेच चित्र दिसत आहे. खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झाले आहेत, अशी नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपींच्या शोधासाठी तीन ते चार विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे दरम्यान दोघा सख्या भावांचा टोकळ्यांकडुन खुन नक्की कोणत्या कारणासाठी करण्यात आला याबाबत अजुनही स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगत या खुन प्रकरणात तीन ते चार संशयितांची नावे समोर आली असून त्यांचा पोलिस शोध घेत असल्याचे पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…