दिंडोरी तालुक्यात युवकाचा अपहरण करून खून
दिंडोरी : प्रतिनिधी
वांजुळे येथील युवकाचे टिटवे येेेऊन अपहरण करुन त्याचा खुन करुन मृतदेह पुरुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी ,हरीश्चन्द्र कचरु शेवरे वय 36 ,रा.वांजुळे ,ता.दिंडोरी यास टिटवे येथील अशोक नवले यांचे किटकनाशक दुकानासमोरुन अज्ञात वाहनात जबरदस्तीने बसवुन
छगन पुंडलीक गांगोडे वय 27, रा.वारे ,ता.दिंडोरी ,दिपक पुंडलिक हिंडे वय 19 ,रा.तळ्याचा पाडा ,मनोहर उर्फ मनु अंबादास गांगोडे वय 24, रा.वारे ,अशोक कडु नवले वय 36, रा.टिटवे ,पंडित साहेबराव शेळके रा.टिटवे ,देवीदास वसंत गांगोडे रा.भोकरपाडा ,खंडु उर्फ महेन्द्र देवीदास गांगोडे वय 33, रा.वारे यांनी अपहरण केले.या
सात संशयीताविरोधात पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांनी फिर्याद दिल्याने या संशयीताविरोधात अपहरणाचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला होता.आज हरीश्चन्द्र शेवरे याचा खुन या संशयीतानी केल्याच्या चौकशी कामी त्या
ता ब्यात घेतल्यानंतर किरकोळ शाब्दिक वादातुन शेवरेचा खून करण्यात आल्याची माहीती प्राप्त झाली . वारे गाव परीसराच्या पुढे डोंगराळ भागात खड्डा करुन शेवरेचा मृतदेह पुरण्यात आला होता.संशयीतापैकी एकास घटनास्थळी नेल्यानंतर माहीतीनुसार मृतदेह बाहेर काढुन घटनास्थळावर उत्तरीय तपासणी करण्यात आली.एकुण या प्रकरणात संशयीतांची संख्या आठ असल्याची माहीती मिळाली असुन उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश बोडखे अधिक तपास करत आहेत.फाॕरेन्सिक टिमने आवश्यक पुरावे संकलीत करण्यासाठी भेट दिलीआहे.दरम्यान शेवरे हा गेल्या दहा डिसेंबर पासुन गायब असल्याची माहीती देण्यात आली.संशयीत यांना दिंडोरी सबजेलमधे हलविण्यात आले आहे.दरम्यान शेवरे हा दहा डिसेंबर पासुन गायब असल्याने त्याचे भावाने हरविल्याची तक्रार वणी पोलिसात दिली.तदनंतर शेवरे याचे अपहरण झाल्याची माहीती चौकशी त निष्पन्न झाली.व तदनंतर खुन करुन मृतदेह खड्यात पुरल्याची बाब उघडकीस आली.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…