एटीएम पिन चुकीचा सांगितल्याने खून

चार संशयित जेरबंद : गुन्हेशाखा युनिट एकची कामगिरी

पंचवटी : वार्ताहर
म्हसरूळ परिसरातील चामरलेणी येथील अज्ञात व्यक्तीच्या झालेल्या खून प्रकरणाची उकल करण्यात गुन्हेशाखा युनिट एकला यश आले आहे. या खून प्रकरणातील चार संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हेशाखा युनिट एकने ही कामगिरी बजावली आहे.
फिर्यादी प्रभाकर रंगनाथ सोनवणे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दि. 22 जून रोजी सकाळी चामरलेणी येथे मारले होते. गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हेशाखेच्या पाच टीम तयार केल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट एककडील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तत्काळ भेट देऊन आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. अज्ञात मृताची ओळख पटवली. त्याचे नाव उमेश नागप्पा आंबिगार (वय 34, कर्नाटक) असे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून काही संशयित वाहने निदर्शनास आली. त्या संशयित वाहनांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढून त्यातील एक संशयितांची मोटारसायकल निष्पन्न केली. मोटारसायकलचा शेवटपर्यंत माग काढून संशयितांची नावे निष्पन्न केली. हे आरोपी म्हसरूळ व बोरगड परिसरातील असल्याचे खात्रीशीर समजले. याअनुषंगाने या पथकाने संशयितांचा म्हसरूळ व बोरगड परिसरात शोध घेतला असता, शुक्रवारी (दि.4) विजय मधुकर खराटे (वय 20, जैन मंदिरजवळ, म्हसरूळ), संतोष सुरेश गुंबाडे, (वय 26, कोळीवाडा, म्हसरूळ), अविनाश रामनाथ कापसे (20, गणेश अपार्टमेंट, मखमलाबाद), रवी सोमनाथ शेवरे (वय 28, रा. दत्तमंदिरच्या मागे, मानोरी गाव, दिंडोरी) यांना शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सांगितले की, रवी शेवरेने आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ ट्रकचालकाची रेकी करून या चालकाकडून मोबाईल व भरपूर पैसे मिळतील, अशी माहिती दिली. आम्ही चौघांनी प्लॅन तयार करून ट्रकमध्ये अविनाश कापसे, संतोष गुंबाडे, विजय खराटे यांनी सिगारेट पेटवण्याच्या बहाण्याने ट्रकच्या केबिनमध्ये घुसून पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. यावेळी संतोष गुंबाडे याने टोकदार दगडाने चालकास डोक्यास मारून, तसेच व इतर दोघांनी त्यास गंभीर मारहाण करून जखमी केले. त्याच्याकडील दोन एटीएम कार्ड काढून घेत एटीएमचा पिन विचारला. संतोष गुंबाडे पैसे काढण्यासाठी गेला.
ट्रकचालकाने एटीएमचा पिने चुकीचा सांगिल्याने व एटीएममधून पैसे न निघाल्याने त्यास पुन्हा ट्रकच्या केबिनमध्ये मारहाण करून मोटारसायकलवर बसवून चामरलेणीच्या पायथ्याशी नेले. तेथे दांडक्याने, दगडाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथे साचलेल्या पावसाच्या डबक्यात नाक व तोंड बुडवून, गाळा दाबून त्यास ठार मारल्याची कबुली दिली. संशयितांना पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *