नाशिक: आजी आणि नातवाचे नाते अनोखे असते, परंतु या नात्याला काळिमा फासल्याची घटना उघडकीस आली आहे, त्रंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे नातवाने हातातीत कड्या ने वार केल्यामुळे वर्मी वार लागल्याने गंगूबाई गुरव वय70 यांचा मृत्यू झाला, लहानपणापासून हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या नात्वानेच आजीचा जीव घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे, याप्रकरणी दशरथ गुरव वय22 यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,