सिडको: विशेष प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र सुरूच असून, पंचवटी, सिन्नर फाटा, देवळाली कॅम्प येथील खुनाच्या घटना ताज्या असतानाच काल रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रवी शंकर मार्गावर अनैतिक संबंधातून एकाचागोळ्या घालून खून झाल्याची घटना घडली, माजी सैनिक असलेल्या अमोल काठे याच्या पत्नीचे संशयित आरोपीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय अमोल ला होता, यामुळे कोर्टात फारकत घेण्यापर्यंत ची वेळ आल्याने याचा जाब विचारण्यासाठी अमोल हा रविवारी रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री रविशंकर मार्ग येथील महादेव सोसायटीमध्ये गेला.त्यानंतर अमोल काठे आणि कुंदन घडे यांची भेट झाली आणि त्यात दोघांमध्ये वाद झाले . अमोलने कुंदनवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या झटापटीत अमोलच्या हातातील हत्यार खाली पडले आणि आपल्या जवळील रिव्हालव्हर त्याने काढली, तीही झटापटीत खाली पडली . ती रिव्हालव्हर कुंदनच्या हाती लागली, त्याने क्षणाचा विलंब न लावता त्या रिव्हालव्हरमधून अमोलच्या डोक्यात गोळी झाडली.गोळी लागताच अमोल खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व युनिटचे पथक आणि अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेतली. जखमी कुंदन घडे याचा भाऊ चेतन घडे यास ताब्यात घेतले आहे.या खुनांच्या घटनेमुळे नाशिक शहरात असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे