जन्मदात्या आईचा खून करणाऱ्या कुपुत्रास कोर्टाने दिली ही शिक्षा

नाशिक : प्रतिनिधी

कामधंदा करीत नाही, म्हणून बोलल्याचा राग आल्याने जन्मदात्या आईचाच गळा आवळून खून करणार्या मुलाला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. वडाळागावातील गणेश नगरमध्ये नोव्हेंबर २०१८ मध्ये ही घटना घडली होती.
अल्लाउद्दीन कमरुद्दीन शेख असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रुक्साना कमरुद्दीन शेख (६८, रा. गणेश नगर, वडाळागाव, इंदिरानगर) असे मयत महिलेचे नाव आहे. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी साडेचार ते सात वाजेच्या दरम्यान सदरची घटना घडली होती. आरोपी अल्लाउद्दीन हा काहीही कामधंदा करीत नसल्याने आई रुक्साना हिने त्यास कामधंदा करण्याचे सांगितले असता, त्याचा राग येऊन आरोपी अल्लाउद्दीन याने आई रुक्साना यांचे नाक-तोंड दाबून गळा आवळून जीवे ठार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तोंड आेढणीने तर हातपाय दोरीने बांधून ब्लँकेटमध्ये मृतदेह गुंडाळला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन सहायक निरीक्षक एन.एन. मोहिते यांनी तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा सत्र न्यायधीश श्रीमती आर. एन. शिंदे यांच्यासमोर खटल्याचे काम चालले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *