शिंदे गावात महिलेचा निर्घृण खून

नाशिक: प्रतिनिधी

नाशिक पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले असून, नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथे एकाने घरात घुसून एका महिलेवर चाकूने वार केले, यात ही महिला रक्तस्राव होऊन मृत्युमुखी पडली, जनाबाई शिवाजी बर्डे असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचा खूनझाल्यानंतर हल्लेखोर पसार झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून हल्लेखोराला टोल नाका येथून ताब्यात घेतले, निकिश पवार असे या संशयितांचे नाव आहे,, याबाबत नाशिकरोड पोलिसांनी  हल्लेखोरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *