नाशिक : प्रतिनिधी
नाशिकरोड येथील एकलहरे रोड येथील पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीच्या खुनाचे गूढ अखेर उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबधातून भाच्यानेच मामीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. क्रांती सुदाम बानेरिया या महिलेचा चाकूने वार करून खून झाला होता तर महिलेचा भाचा अभिषेक वर वार केले होते, अज्ञात व्यक्तीने हा खून केल्याचे बोलले जात होते, परंतु पोलीस तपासात अभिषेक यानेच हे कृत्य केल्याचे उघड झाले, एकतर्फी प्रेमातून त्याने मामी क्रांती चा खून करून स्वतावरही वार करून घेतले होते, याप्रकरणी पती सुदाम याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,