नांदगावला दाजीने केला शालकाचा खून
संशयित आरोपी एका शाळेचा मुख्याध्यापक
नांदगाव: प्रतिनिधी
येथील आनंद नगर मध्ये राहणाऱ्या वाल्मीक साहेबराव ठाकुर ( पवार) (३५ ) या युवकाची मंगळवार दि १६ रोजी रात्री लोखंडी हातोडीने वार करत हत्या करण्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करत एक संशयितांस अटक करण्यात आली आहे. मयत वाल्मीक ठाकुर ( पवार ) याच्यावर त्याच्या राहत्या घरी (आनंद नगर) त्याच्या पायांवर आणि डोक्यात लोखंडी हातोडीने वार करत गंभीर जखमी करत त्याची हत्या करण्यात आली आहे.संशयीत आरोपी याच्या सासु सासऱ्यांना म्हणजेच मयत झालेल्या वाल्मीक ठाकूर (पवार) याचे आई वडीलांना मयत वाल्मीक ठाकूर (पवार) नेहमीच दारु पिऊन मारहाण करत आसल्याने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलीसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा करत गुन्हा दाखल केला असून पुढिल तपास पोलिस करत आहे.