शिवाजीनगरमध्ये २० वर्षीय तरुणाचा खून, प्रेमप्रकरण की वैयक्तिक वाद?
सिडको : दिलीपराज सोनार
गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात एका २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नसीम अकबर अली शहा (वय २०, रा. गुरुद्वारा रोड, म्हशीचा तबेला, सातपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी प्रेमप्रकरण अथवा मुलीच्या छेडछाडीमधून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. नसीमचा चुलता यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
खून झाल्यानंतर नसीमला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. हत्येचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिस विविध शक्यतांचा तपास घेत आहेत. या प्रकरणी लवकरच महत्त्वाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…