इगतपुरीत जोगेश्वरी परिसरात हातोडीचा घाव घालून खून

संशयित शिताफीने ताब्यात, अटक

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरीतील जोगेश्वरी परिसरात शनिवारी (दि. 28) सायंकाळी तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना उमंग हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावर घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी धाव घेत खून करणार्‍या संशयिताला शिताफीने ताब्यात घेत अटक केली.
संशयित जनकराम श्रीराम चव्हाण (रा. हुसेनबाद, बलरामपूर, उत्तर प्रदेश) याने प्रद्युम्न रामधनी चव्हाण (वय 34, रा. हसवर, जि. आंबेडकरनगर, उत्तर प्रदेश) याच्या डोक्यावर हातोडीने जोरदार वार केला. त्यात प्रद्युम्न चव्हाणचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताचा भाऊ रणजित चव्हाणने इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव व पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. प्रद्युम्नचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. इगतपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित जनकराम चव्हाण याला अटक केली. पोलीस निरीक्षक अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तपास करत आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *