सातपूर : प्रतिनिधी
सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपा जवळील एच डी एफ सी एटीएम शोरूम जवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास महेश सार्थी (वय २२) याची अज्ञातांनी चाकूने वार करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हत्येनंतर मारेकरी फरार झाले असून आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
ही हत्या कोणत्या कारणावरून झाली आणि कोणी केली याचा पोलीस शोध घेत आहे . सार्थी याच्या सोबत त्याचे जोडीदार एका हॉटेलात कामाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे चौकशीसाठी त्याना देखील पोलीस स्टेशनला ठेवले आहे, या घटनेबाबत 112 नंबरला काॅल आल्यानंतर पोलीस घटनास्थळावरून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत,सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख,सिताराम कोल्हे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्यासह गुन्हेशोध पथक दाखल झाले होते.