शेतमजूर पतीनेच केली पत्नीची  हत्या

लासलगाव प्रतिनिधी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मध्यप्रदेश मधील शेतमजुर पतीनेच दारूच्या नशेत त्याच्या पत्नीची गळफास देवन हत्या केल्याची घटना मानोरी खुर्द ता निफाड येथे घडली असून मारेकरी पतीस पोलिसांनी येवला शहर येथुन ताब्यात घेतले असुन त्याच्या विरुध्द भादवि कलम ३०२ प्रमाणे लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स पो नि राहुल वाघ यांनी दिली आहे

या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितनुसार मानोरी खुर्द येथील पोलीस पाटील रतन भवर यांनी आज सोमवारी लासलगाव पोलिस ठाण्यात फोन करुन कळविले की आंबादास शंकर संभेराव रा मानोरी खु .यांच्या शेतात शेत मजुर म्हणून काम करणारी महिला ही त्यांचे पॉलिहाऊस मधील शेतात संशयास्पद रित्या मृत आवस्थेमध्ये पडलेली असल्याची माहिती दिली.
ही माहिती मिळताच तातडीने सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पोलीस अंमलदार असे घटनास्थळी रवाना झाले .घटनास्थळी जावुन खात्री केली असता मयत आशा प्रेमा वासकले वय ३२ वर्ष रा तीरी ता सेगांव,जि . खरगोन राज्य मध्य प्रदेश हिला तिचा पती प्रेमा ( पेमा ) इडा वासकले रा .तीरी ता .सेगाव जि .खरगोन राज्य मध्य प्रदेश यानेच तीच्याच साडीचे पदराने गळफास देवुन जिवे ठार मारले बाबत मयताचे मामा ध्यनसिंग मेथु चव्हाण , , रा .केली ता .सेगाव जि .खरगोन राज्य मध्य प्रदेश याने सांगितले.

या मिळालेल्या माहितीवरून सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पोउनि एल के धोक्रट पोलीस नाईक संदिप शिंदे, औदुंबर मुरडनर,देवीदास पानसरे व पोलीस कॉन्टेबल प्रदिप आजगे यांची तपास पथके तयार करुन रवाना केली व मयतास मारणारा तिचा पती प्रेमा ( पेमा ) इडा वासकले यास सचिन पाटील,पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण,माधुरी कांगणे,अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांनी केलेल्या गुन्हयाचे तपास सुचना व मार्गदर्शन केल्याप्रमाणे येवला तालुका पोलीस ठाणेचे अंमलदार आबा पिसाळ यांच्या मदतीने येवला शहर येथुन ताब्यात घेतले असुन आरोपी प्रेमा (पेमा) इडा वासकले याचे विरुध्द भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एल.के. धोक्रेट पोना संदिप शिंदे व औदुंबर मुरडनर हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *