मुस्लिम कुटुंबाकडून घडतेय वारकऱ्यांची सेवा,दिंडीला १९ वर्षांपासून भोजन,चहा-नाश्त्याची व्यवस्था

टाकळी(विंचूर)येथील मुस्लिम कुटुंबाकडून घडतेय वारकऱ्यांची सेवा

लोणी खुर्द ते अंतापूर पायी दिंडीला १९ वर्षांपासून भोजन,चहा-नाश्त्याची व्यवस्था

लासलगाव:-समीर पठाण

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ओम शिव पार्वती पालखी दिंडी व भजनी मंडळाचे अध्यक्ष राजाराम आहेर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या २१ वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मलिकनाथ) अखंड रथ पालखी,पायी दिंडी सोहळा आणि रामनवमी वारी सुरू आहे.वारीदरम्यान टाकळी (विंचूर) (ता. निफाड) येथील मुस्लिम कुटुंबीयांकडून न चुकता दरवर्षी अखंड रथ पालखी व पायी दिंडीचे भावपूर्ण उत्साहात स्वागत करण्यात येते.एवढेच नव्हे तर या पायी दिंडीचा मुक्कामच या मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी असतो.यावेळी शेख कुटुंबीयांकडून दिंडीतील वारकऱ्यांच्या मुक्कामासह सर्वांसाठी रात्रीचे भोजन व सकाळी चहा नाश्त्याची सोय करण्यात येते.

निफाड तालुक्यातील टाकळी (विंचूर) गावातील शेतकरी कुटुंबातील नजीर अहेमद शेख,फातेमा नजीर शेख हे दाम्पत्य मागील १९ वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मल्लिकनाथ) अखंड रथ पालखी व पायी दिंडी सोहळा आणि रामनवमी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मनापासून सेवा करत असतात.या धार्मिक कार्यात त्यांना त्यांचा मुलगा राजमहंमद नजीर शेख,सून यास्मिन राजमहंमद शेख,नातू वसीम राजमहंमद शेख, नातसून मुस्कान वसीम शेख यांचीही साथ मिळत असते. पायी दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था हे कुटुंबीय स्वतः करतात.

या वेळी सुध्दा सुमारे २०० वारकऱ्यांना शेख कुटुंबीयांनी बाजरीची भाकरी,पोळी,पातवड्याची काळ्या मसाल्यातील भाजी,भात आणि गोड शिऱ्याचे भोजन देऊन तृप्त केले.तसेच सकाळचा चहा-नाश्ता जिगर खान यांच्याकडून देण्यात आला.या पायी दिंडीत यंदा ५८ पुरुष, ३० महिला,तर १३ बालगोपाळांसह १०१ वारकरी सहभागी झाले आहेत.

टाकळी विंचूर येथील राजमहंमद शेख हे गरीब शेतकरी कुटुंब मुस्लिम असेल तरी गेल्या १९ वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करून सामाजिक एकोपा ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.पायी दिंडीत कोणत्या देवाला भजतात,याचा विचार न करता माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ मानून मुस्लिम शेख कुटुंबीय वारकऱ्यांची सेवा करतात ही अभिनंदनीय बाब आहे.

वेदिका होळकर,
अध्यक्षा,महिला दक्षता समिती,लासलगाव.

वारकऱ्यांना लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मल्लिकनाथ) पोहोचण्यासाठी शेकडो किमी अंतर चालावे लागते. माझ्या आई-वडिलांनी गेल्या १९ वर्षांपासून वारकऱ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करण्यासाठी पायी दिंडीचे स्वागत करून सेवेचे काम करत असल्याचे आम्ही बघितले आहे. त्यांनी सुरू केलेली ही उज्ज्वल परंपरा अखंडित सुरू ठेवणार आहे.

राज महंमद शेख,टाकळी-विंचूर

Bhagwat Udavant

Recent Posts

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

17 minutes ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

20 minutes ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

26 minutes ago

मनमाड शहरात वाहतूक कोंडी; गाडी बंद, रस्ता बंद

वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; खासदारसाहेब, आम्हाला या जाचातून मुक्त करा! मनमाड : प्रतिनिधी दुष्काळी अन् पाणीटंचाई…

33 minutes ago

वीज वितरणकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट

दहमहा वीजबिलात दुप्पट, तिप्पट वाढ; ग्राहकांमध्ये संतापाची भावना निफाड : तालुका प्रतिनिधी वीज वितरण कंपनीकडून…

38 minutes ago

वारी…ज्ञानराज माउलींचे वरदान!

लोकीचे वैकुंठ पंढरपूर येथे होणारा आषाढीवारीचा महामेळा महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संचित आहे. 12 व्या…

50 minutes ago