कोण मारणार बाजी? उत्सुकता शिगेला
नाशिक: देवयानी सोनार
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मतदानानंतर आज मतमोजणी होत आहे, मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे, सद्या मतपत्रिकाची जुळवा जुळव केली जात आहे, लवकर निकाल लागण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे, उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर मतपेट्या फोडल्या जात आहेत, या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती आणि विरोधी परिवर्तन पॅनल मध्ये लढत होत आहे, सरचिटणीस पदाच्या उमेदवार नीलिमा पवार आणि नितीन ठाकरे यांच्या पॅनल मध्ये लढत झाली, दोन्ही बाजुंनी जोरदार आरोप प्रत्यारोप झाले, त्यामुळे सभासदांचा कौल कुणाला याचे उत्तर काही तासातच मिळणार आहे, मतमोजणी स्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे, दोन्ही गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत,
१००% प्रगती