नीलिमा पवार यांचे संस्थान खालसा, 20 वर्षानंतर ठाकरे सरकार
नाशिक: प्रतिनिधी
संपूर्ण जिल्यातील जनतेचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि आरोप प्रत्यारोप मुळे गाजलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील नीलिमा पवार यांचे संस्थान अखेर नितीन ठाकरे यांनी खालसा केले, मागील पंचवार्षिक ला अवघ्या145 मतांनी विजयाची संधी हुकलेल्या ठाकरे यांनी तब्बल 1264 मतांनी नीलिमा पवार यांना धूळ चारली, एवढ्या मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे नीलिमा पवार यांच्या विषयी असलेली नाराजी मतपेटीतून सभासदांनी व्यक्त करत संस्थेतील भाकरी फिरवली, सत्ताधारी प्रगती पॅनलला सुनील ढिकले यांच्या रूपाने अवघी1 जागा।मिळाली, अध्यक्ष पदाचे उमेदवार माणिक कोकाटे यांचा त्यांनी पराभव केला, परिवर्तन पॅनेलने 20 जागा जिंकत इतिहास घडवला, या विजयाने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत ठाकरे पर्व सुरू झाले आहे,
10 हजाराहून अधिक सभासद असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसाठी रविवारी तब्बल95 टक्के मतदान झाले, काल सकाळ पासून मतमोजणीला प्रारंभ झाला, वाढलेल्या मतांचा टक्का पाहता सत्ताधाऱ्यांना धक्का बसेल, असा अंदाज वर्तवला जात होता, तोअखेर खरा ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले, प्रगती पॅनलचे सुनील ढिकले वगळता सर्व उमेदवारांना पराभव पत्करावा लागला, ठाकरे यांनी गेल्या पंधरा वर्षात अतिशय संयमी भूमिका घेत सत्ताधाऱ्या च्या गैरकारभारविरुद्ध आवाज उठवला, प्रगती पॅनेलने उमेक्सवारांची निवड करताना एक डझन हुन अधिक विद्यमान संचालक आणि काही पदाधिकारी याना थांबवत भाकरी फिरवली, नवीन चेहरे रिंगणात उतरवले, परंतु तरीही नीलिमा पवार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा संस्थेच्या कारभारातील हस्तक्षेपाचा ठाकरे यांनी प्रचार करत संस्था वाटचाल करत असल्याचे मतदारांवर बिंबवले, त्यामुळे मतांचा टक्का वाढला, मतदारांच्या मनात असलेली खदखद बाहेर पडली, त्यामुळे आलेल्या सुनामीत प्रगतीचा वारू भर कटुन गेला,
परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार माणिक कोकाटे यांनी कडवी झुंज दिली, परंतु सुनील ढिकले यांचा जिल्हाभर असलेल्या संपकाचा त्यांना वैक्तीक फायदा झाला,
सत्ताधारी प्रगती पॅनल बद्दल सभासदांमध्ये मोठी नाराजी होती, ती दूर करण्याचा प्रयत्न नीलिमा पवार यांनी केला मात्र त्यात यश आले नाही, उलट मागील वेळेस नितीन ठाकरे यांचा अल्प मताने पराभव होऊनही त्यांनी पाच वर्षे सभासद हित जोपासत संपर्क कायम ठेवला, याउलट नीलिमा पवार यांच्याविषयी सभासदांच्या मनात नाराजी होती, त्यांच्या मुलाचा आणि मुलीचा संस्थेच्या कामात हस्तक्षेप यामुळे त्यांना फटका बसला माणिक कोकाटे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी केलेल्या आक्रमक प्रचाराचा परिवर्तनाला फायदा झाला,
रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती,विजयानंतर ठाकरे समर्थकांनी विजयाचा जल्लोश केला,
कर्मवीरांच्या विचारांचा विजय
हा कर्मवीरांच्या विचारांचा विजय असून गेल्या पाच वर्षापासून संस्थेत सुरू असलेला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तीन सरचिटणीसांचं सरकार आणि कर्मचाऱ्यांवर होणारा अत्याचार हा मोठ्या प्रमाणावर फोफावला होता.सभासदांनी ही निवडणूक हातात घेतली होती.झालेला विजय माझा नसून सर्वांचा आहे. संस्था कशी उंच भरारी घेईल हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन काम करेल.उतणार नाही मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही.
ॲड.नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस मविप्र नाशिक
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…