नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर
लासलगाव :- समीर पठाण
गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली आहे.परंतु त्या खरेदीला शेतकऱ्यांनी हवा तितका प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे तसेच बाजार समित्यांमधील देखील कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरू असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र दि 26 जुलै रोजी नाफेडने या आठवड्यातील कांदा खरेदी दर जाहीर केले असून तो आता प्रतिक्विंटल 1465 रुपये इतका आहे. हा दर DoCA च्या माध्यमातून जाहीर करण्यात आला असून त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील केंद्रांवर आता या नवीन दराने कांदा खरेदी केला जात आहे.यापूर्वी नाफेडचा दर 1515 रुपये इतका होता व आता जाहीर केलेला दर हा 1445 रुपये प्रतिक्विंटल असल्याने जवळपास त्यात 45 रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमच कांद्याच्या दर घसरणीला तोंड द्यावे लागते व यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामागील प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारचे कांदा धोरण याला सर्वस्वी जबाबदार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.कांदा निर्यातीबद्दल सरकारचे निश्चित असे धोरण नसल्यामुळे कांद्याचे दर घसरतात असा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे