महाराष्ट्र

नाफेडने थेट कांदा खरेदी सुरू करावी

शेतकर्‍यांची मागणी; आवक वाढल्याने दरात घसरण, शेतकरी अडचणीत

लासलगाव : वार्ताहर
कांद्याचे प्रमुख आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली आहे. लासलगावसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितींमध्ये कांद्याची मोठी आवक होत असल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यात अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहेत. अशात अद्याप नाफेड आणि एनसीसीएफने खरेदीला सुरुवात केलेली नाही. नाफेडने थेट बाजार समितीमधून कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.
आशिया खंडातील सर्वार्ंत मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या सरासरी 1000 ते 1100 रुपये प्रतिक्विंटल असा नीचांकी भाव मिळत आहे. या दरात शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सन 2023-24 च्या हंगामात नाशिक जिल्ह्यात कांद्याची लागवड झाली होती. या हंगामात शेतकर्‍यांना चांगलं उत्पादन मिळालं होतं. त्यामुळं यंदाच्या हंगामातदेखील कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेनं कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती.
सध्या बहुतांश शेतकर्‍यांनी कांदा काढणी पूर्ण केली आहे. परंतु, कमी बाजारभावामुळे शेतकर्‍यांनी कांदा साठवून ठेवला आहे. त्यातच अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसत असल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.
केंद्र सरकारने बफर स्टॉकसाठी  नाफेड आणि एनसीसीएफमार्फत प्रत्येकी दीड लाख टन म्हणजे एकूण तीन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे, मात्र, ही खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

 

Gavkari Admin

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

9 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

11 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

1 day ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

1 day ago