नैताळेच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून अमरनाथच्या बाबा बर्फानीना कांद्याचा प्रसाद

नैताळेच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून

अमरनाथच्या बाबा बर्फानीना कांद्याचा प्रसाद

केंद्र व राज्य सरकाला सुबुध्दी देवो..! पाच किलो कांदे देवापुढे  ठेवून केली प्रार्थना

लासलगाव : समीर पठाण

जम्मु-काश्मीर राज्यातील प्रसिद्ध देवस्थान व पवित्र गुंफा म्हणून बाबा अमरनाथ व तेथील यात्रा उत्सव देशात व देशाबाहेर प्रसिध्द आहे.नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी आपल्या स्वतःच्या घरुन पाच किलो कांदे घेऊन अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरु केला तब्बल सहा दिवसाच्या रेल्वे,घोड्यावरील,पाई प्रवासानंतर तो पाच किलो कांदा बाबा अमरनाथ(बाबा बर्फानी )यांना प्रसाद म्हणून अर्पन केला व देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने प्रार्थना केली की कांदा पिकाला योग्य भाव मिळू दे..कांदा आयात निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुध्दी दे…..! अशा प्रकारची प्रार्थना करुन तो कांद्याचा प्रसाद तेथे उपस्थित असलेल्या व देशसेवेसाठी रात्र दिवस पहारा करणाऱ्या सैनिकांना दिला.

अमरनाथ यात्रा जगभरात प्रसिध्द आहे.हा उत्सव जम्मु-काश्मीर राज्यात १ जुलै २०२३ पासुन सुरु झाला आहे.भगवान शंकराची पवित्र गुंफा म्हणून मोठा नावलौकिक आहे.टप्या,टप्याने अनेक राज्यातील भाविक बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी प्रवास करत आहे.या नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे अमरनाथ यात्रेसाठी सोबत पाच किलो कांदे घेऊन बाबा बर्फानी च्या पवित्र गुंफेत समोर असलेल्या दानपेटीला स्पर्श करून पुजाऱ्यांनी परत दिले तेच कांदे साठे यांनी तेथे यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी असलेल्या भारतीय लष्करी जवानांसाठी एका जवानाकडे सुपूर्त केले.श्री साठे यांनी अमरनाथ (बाबा बर्फानीकडे ) अशी इच्छा व्यक्त केली की वर्षभरापासून कांद्याला भाव नाही उत्पादन खर्च भेटत नाही शेतकरी कर्जबाजारी होत आहे शेतकऱ्यांना चांगले पैसे व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने लक्ष द्यावे सदबुद्धी द्यावी तसेच अनेक जण देवापुढे पेढ्याचा प्रसाद ठेवतात हरगुच्छ वाहतात.मी पण माझ्या शेतात रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेले कांदे सर्व भारतीय शेतकऱ्यांच्या वतीने बाबा अमरनाथ गुंफेत ठेवून देशासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देतात अशा जवानांना ते दिले आहे.

पहेलगाम ते बाबा अमरनाथ गुहेपर्यंत पाऊस व बर्फ थंडी असा खडतर प्रवास करीत साठे यांनी पाच किलो कांदे घेउन गेले होते सुरक्षारक्षकांनी साठे यांना गुफेत कांदे नेण्यास विरोध केला होता परंतु साठे यांनी सांगितलं की इतर लोक त्यांच्या श्रद्धेप्रमाणे प्रसाद ठेवतात त्यानुसार माझी श्रद्धा आहे की मी माझ्या शेतात पिकवलेले कांदे प्रसाद म्हणून आणले आहे तेव्हा चेक करून त्यांनी परवानगी दिली.याप्रसंगी बाजीराव अभंग,दिलीप घायाळ,श्रीकांत मंडलिक, दिलीप निकम,पवन वाकचौरे,संतोष घायाळ,ज्ञानेश्वर देसले,गणेश जेऊघाले इत्यादी शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *