महाराष्ट्र

नांदगाव-मनमाड महामार्ग बंद होणार?

मनमाड ः विशेष प्रतिनिधी
नांदगाव ते चांदवड रस्त्याच्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, अनेक ठिकाणी पुलाचे अर्धवट काम झालेले आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढली असून, रोज होणार्‍या अपघातांत अनेकांना अपंगत्व येत असून, आर्थिक भुर्दंड बसत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे सर्व काम पूर्ण करावे; अन्यथा भविष्यात पाऊस जास्त प्रमाणात झाला तर मनमाड-नांदगाव हा महामार्ग पूर्णपणे बंद होऊ शकतो व नांदगाव शहराशी संपर्क तुटू शकतो. यामुळे या महामार्गावर सुरू असलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरू
लागली आहे.
चांदवड ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग क्रॉंक्रिटीकरण करून चौपदरी करण्याचे काम सुरू आहे. बहुतांश भाग हा तयार झाला असून, नांदगाव ते मनमाड या भागाचे काम मात्र अत्यंत संथगतीने सुरू आहे. या 24 किलोमीटर अंतरात जवळपास छोटे-मोठे 17 पूल आहेत. या सर्व पुलांचे काम अर्धवट स्वरूपात असून, चांदवड ते मनमाड हा रस्ता पूर्ण झाला असला तरी 3 पूल हे अर्धवटच राहिलेले आहेत. या अर्धवट राहिलेल्या पुलाच्या कामामुळे वाहनचालकाला या जागेचा अंदाज येत नाही. परिणामी, रोज छोट्या-मोठ्या स्वरूपात अपघात होत आहेत.
अनेकांचे या अपघातात प्राण गेले तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले.
मात्र तरीही या रस्त्याच्या काम करणार्‍या ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसून, अत्यंत संथगतीने काम
सुरू आहे. संबंधित अधिकारी किंवा विभागाने याकडे लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच विलंब करणार्‍या या ठेकेदाराला शासनाच्या नियमानुसार आर्थिक दंड आकारावा, अशी मागणी जोर धरू
लागली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

11 hours ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

2 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

2 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

2 days ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

2 days ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

3 days ago