रुपाली खैरे यांची दुबई वारी
नांदुर्डी: राजेंद्र थोरात
निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील सर्वसामान्य कुटुंबातील सौ रुपाली पद्माकांत खैरे यांनी जिद्दीच्या जोरावर दुबई येथे जाऊन इंटरनॅशनल मेअकप आर्टिस्ट कोर्स पूर्ण करून लंडन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी तर्फे गौरव प्राप्त केला आहे
नांदुर्डी सारख्या ग्रामीण भागातून कलेची जोपासना करत गावातच नारी शृंगार ब्युटी सारखा छोटा व्यवसाय सुरू करून ग्रामीण भागातील गोरगरीब मुलींना त्या मदत करत होत्या.स्पर्धे च्या युगात आपण काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने दुबई येथे लंडन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत जाऊन इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट हा कोर्स पूर्ण केला .परदेशात जाऊन कठीण प्रसंगातही जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली .अशा त्या नांदुर्डी सारख्या ग्रामीण भागातील पहिल्याच महिला आहे. दुबई येथे एका भव्य शानदार समारंभात त्यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. गोरगरीब मुलींना त्या येथुन पुढे मार्गदर्शन करणार आहे.निफाड परिसरातून त्याचे कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…