नांदूरशिंगोटे दरोडा प्रकरणातील सात संशयितांना अटक 

नाशिक : वार्ताहर
संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या नांदूरशिंगोटे दरोडा प्रकरणातील सात संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तपासात वावी येथील आणखी एका दरोडयासह मालमता चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी शुक्रवारी (दि.११) तालुका पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
वावी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २४ ऑक्टोबरला पहाटेचे सुमारास नांदूरशिंगोटे गावातील रहीवासी संतोष गंगाधर कांगणे व रमेश तुकाराम शेळके यांचे घरामध्ये संशयीत रविंद्र शाहू गोधडे (१९, रा. राजदेरवाडी, ता. चांदवड) सोमनाथ बाळु पिंपळे(२०, रा. मनमाड फाटा, लासलगाव, ता. निफाड) करण नंदू पवार( १९, रा. इंदिरानगर, लासलगाव, ता. निफाड) दिपक तुळशीराम जाधव, (रा. चंडिकापुर, वणी, ता. दिंडोरी) यांनी दरोडा टाकला होता. त्यांना पोलिसांनी राजदरेवाडी चांदवड येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी दिवाळीचे दिवशी पहाटेचे सुमारास साथीदार सुदाम बाळु पिंपळे (रा. राजदेरवाडी, ता. चांदवड), बाळा बाळु पिंपळे( रा. गुरेवाडी, ता. सिन्नर) यांनी दरवाजाचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून लोखंडी पहार व चाकुचा धाक दाखवून काठीने मारहाण करून लाकडी बेडमध्ये ठेवलेले सुमारे १३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम २ ला ख७५ हजार असा एकुण ६ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज दरोडा टाकुन चोरून नेला होता. या दरोड्यात त्यांना करण उर्फ दादु बाळू पिंपळे( रा. गुरेवाडी) यानेही मदत केल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनी सातही संशयितांना अटक केली आहे. यातील सुदाम पिंपळे, बाळा पिंपळे व करण उर्फ दादू पिंपळे याला पोलिसांनी सोलापूरमधील बाभूळगाळ परिसरातून सापळा रचून अटक केली असून संशयितांनी गुन्ह्यातील कबुली दिल्याचे शहाजी उमाप यांनी सांगितले आहे. यावेळी अप्पर अधिक्षक माधुरी कांगणे, उपअधिक्षक निफाड सोमनाथ तांबे आदी उपस्थित होते.
९ लाख २ हजार ४४५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
– गुन्हयातील घटनास्थळावर मिळून आलेले सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दरोड्यातील संशयितांचा माग सातही संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यात लुटलला सोन्याचे नेकलेस, लक्ष्मीहार, गंठन, पेंन्डल, कानातले वेल, सोन्याची छैन, अंगठी, डोरले, नथ, झुबे, पोत असे एकुण १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत रुपये ५ लाख ६९ हजार ,९७० रुपयांसह ८ मोबाईल फोन, ५ मोटर सायकल असा एकुण ९ लाख २ हजार ४४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यावेळी अप्पर अधिक्षक माधुरी कांगणे,  उपविभागीय पोलीस अधिकारी  सोमनाथ तांबे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील, सपोनि सागर हिंपी, सपोनि मयुर भामरे, वावी पोलीस ठाण्याचे सपोनि सागर कोते आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *