ननाशी परिसरात मुसळधार पाऊस

भात नागली वरई उडीद पिकांचे अतोनात नुकसान
ननाशी : वार्ताहर

ननाशी परिसरात आज  अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ननाशी परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे.रब्बी पिकांना थोड्याफार प्रमाणात या पावसाचा फायदा होईल मात्र भात नागली वरई उडीद ही पिके सोंगून मळणीसाठी रचून ठेवली होती त्यात पाणी गेल्याने या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे.रचून ठेवलेले धान्य काळे पडण्याची भीती आहे
मागील अवकाळीने नुकसान केलेच परंतु आता धान्य तयार झाल्यानंतर झालेले नुकसान यापेक्षा मोठे आहे.मागील अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही व आता पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजा करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *