मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जर आज जिवंत असते तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते. तसेच उद्धव ठाकरे असतानाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले होते. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लायक व्यक्ती नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप : ना. भुसे
बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर उद्धव ठाकरे केव्हाही कधीही मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असताना बाळासाहेबांनी 1999 मध्ये मला मुख्यमंत्री केले होते. जर उद्धव ठाकरे या पदाला लायक असते तर त्यांनी तेव्हाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असता. परंतु बाळासाहेबांनी माझ्या नावाचा विचार केला. यावरुन उद्धव ठाकरे हे या पदाला लायक नाही. असे राणे म्हणाले.