नरेडको होमथॉन प्रदर्शनाच्या पूर्वतयारीस वेग

स्टॉलधारकांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर
नाशिक : प्रतिनिधी
नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)तर्फे 22 ते 25 डिसेंबरपर्यंत गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित होमथॉन प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू झाली असून, यादृष्टीने स्टॉल धारकांच्या प्रतिनिधींसाठीचे प्रशिक्षण शिबिर शंकराचार्य संकुलात पार पडले. प्रमुख वक्ते केतन गावंड यांनी मार्गदर्शन केले.
घरकुल बुक करण्यासाठी येणारा ग्राहक हा आपल्या आयुष्याची सर्व पुंजी लावीत असतो.त्यामुळे या ग्राहकांशी कसे संभाषण करावे,त्यांच्याशी कसे वागावे आणि त्यांना घर घेण्यासाठी प्रवृत्त करतांना त्यांच्या शंकांचे कसे निरसन करावे याबाबत गावंड यांनी या प्रतिनिधींना संबोधित केले.
प्रदर्शनासाठी हॉस्पिटॅलिटी हा प्रयोग नरेडको प्रथमच अमलात आणत असून घर खरेदीसाठी येणार्‍यांचे अतिथी देव भव सारखे स्वागत करून त्यांचे खास अगत्य केले जाईल,एखाद्या प्रदर्शनाच्या 10 दिवस आधी स्टॉल धारकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्न करणारी नरेडको ही पहिलीच संस्था आहे. या पुढेही बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधींना जर मार्गदर्शनाची गरज भासल्यास नरेडको दर तीन महिन्यांनी अशा अभिनव शिबिराचे आयोजन करेल असे प्रदर्शनाचे समनव्ययक जयेश ठक्कर यांनी सांगितले.
नाशकात अनेक प्रदर्शन होत असतात परंतु स्टॉलधारकांना अशा प्रकारे मार्गदर्शन करणारी नरेडको ही पहिलीच  संस्था आहे. या शिबिराचा 200 हुन अधिक प्रतिनिधींनी लाभ घेतला. प्रास्ताविक नरेडकोचे सेक्रेटरी सुनील गवादे यांनी केले. परिचय भाविक ठक्कर यांनी करून दिला. आभार पुरुषोत्तम देशपांडे यांनी मानले. याप्रसंगी व्यासपीठावर सुनील गवादे, शंतनू देशपांडे जयेश ठक्कर,मर्जीन पटेल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *