डॉ.निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार उदघाटन
१५ लाखांपासून ४ कोटींपर्यंतचे घर घेण्याची संधी
नाशिक: प्रतिनिधी
नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे नाशकातील सगळ्यात भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशन ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी आणि नरेडको नॅशनल प्रेसिडेंट श्री.राजन बांदेलकर यांच्या हस्ते होणार आहे.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार तसेच नरेडकोच्या होमथॉन एक्स्पो २०२२ या प्रदर्शनाची ब्रँड ॲबेसॅडर अभिनेत्री प्राजक्ता माळी ती देखील या प्रदर्शनाला भेट देणार आहेत.अशी माहिती नरेडको अध्यक्ष अभय तातेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरीकांना उपलब्ध होईल,अल्प व मध्यम उत्पन्नगटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी १५ लाखांपासून ते ४ कोटी रुपया पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.अशी माहिती नरेडकोच्या प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले
हे प्रदर्शन ४ डोममध्ये उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून त्यात १२५ हून अधिक स्टॉल्स असतील. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साहित्ये यांये स्टॉल्सही येथे असतील कोणत्याही स्टॉल वर घर बुक करणाऱ्यास लगेचच नरेडको तर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे.तसेच प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांचीही नरेडको तर्फे लकी ड्रॉद्वारे भाग्यवंताला चांदीचं नाणं दररोज मिळणार आहे असे नरेडको चे सचिव सुनील गवादे यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे असून सह प्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो,केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
*प्रदर्शनात मोफत प्रवेश*
प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही मात्र प्रवेशकरण्यापूर्वी नागरीकांना क्यू आर कोड द्वारे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.हे प्रदर्शन डोंगरे वसतिगृह मैदानावर २२ ते २५ डिसेंबर पासून नागरीकांना खुले असून जास्तीतजास्त नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्रदर्शनाचे सह समन्वयक शंतनू देशपांडे यांनी केले आहे.
ग्रीन एक्झिबिशन
नरेडकोच्या ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” या प्रदर्शनात सामाजिक बांधिलकी म्हणून एक अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे.या प्रदर्शनामध्ये जमा झालेला प्लास्टिकचा कचरा पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल मध्ये भरला जाणार असून या बॉटल्स ग्रामीण भागात बांधकामासाठी वापरला जाणार आहे.तसेच या नरेडकोच्या प्रदर्शनात ब्रँडिंगसाठी वापरण्यात आलेले फ्लेक्स होर्डिंग गोळा करून त्याचे छत बनवून गरिब लोकांच्या घरावर छप्पर म्हणून लावण्यात येणार आहे.सामाजिक बांधिलकीतून उपक्रम करणारी नरेडको ही पहिलीच संस्था असणार आहे.असं नरेडकोचे सुनील गवादे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन नंदन दीक्षित यांनी केले
पत्रकार परिषदेस नरेडकोच्या नाशिक चे सचिव सुनील गवादे,सह समन्वयक शंतनू देशपांडे,यांच्यासह पुरुषोत्तम देशपांडे,भाविक ठक्कर,अविनाश शिरोडे,अश्विन आव्हाड,श्रीहर्ष घुगे,प्रशांत पाटील,नितीन पाटील ,मयूर कपाटे,भूषण महाजन,उपस्थित होते.
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक…