२१ डिसेंबर पासून नाशिकमध्ये नरेडकोचे ‘होमेथॉन’ प्रदर्शन

२१ डिसेंबर पासून नाशिकमध्ये नरेडकोचे ‘होमेथॉन’ प्रदर्शन

नरेडको आयोजित “होमेथॉन प्रदर्शनाच्या मंडपाचा भूमिपूजन सोहळा

१५ लाखापासून ५ कोटी पर्यंत घरांचे पर्याय उपलब्ध

नाशिक: प्रतिनिधी

– सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवीदराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २१ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे ५ दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून डोम उभारणीच्या कामाचे भूमिपूजन प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन चंदे यांच्या हस्ते तसेच रुंग्ठा बिल्डकॉनचे प्रमुख ललित रुंग्ठा यांच्या हस्ते अजय बोरस्ते , प्रशांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवीदराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २१ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे ५ दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.नाशिकसह मुंबई पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज असून प्रामुख्याने नाशिक विभागातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, महात्मानगर,सातपूर, आडगाव,हिरावाडी, गोविंद नगर,काठेगल्ली,नाशिकरोड,पंचवटी,वडाळा,पाथर्डी फाटा, त्रिंबकरोड, म्हसरूळ,त्याच प्रमाणे इगपुरी या विभागातील गृह प्रकल्प,ऑफिसेस,प्लॉट, एकाच छताखाली बघण्याची संधी नागरीकांना मिळणार आहे. या प्रदर्शनाची ब्रँड अँबेसेडर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे असून या प्रदर्शनात ती उपस्थित राहणार आहे. या प्रदर्शनात १५ लाखापासून ५ कोटी पर्यंतची घरे ग्राहकांना बघता येणार आहेत अशी माहिती होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर,सह समन्वयक शंतनू देशपांडे,भूषण महाजन यांनी दिली.

डोंगरे वसतिगृह मैदानावर चार डोममध्ये उभारण्याचे काम सुरू झाले आहे. २१ डिसेंबरला प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा संप्पन्न होणार आहे. या प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे ,पॉवर्ड बाय रुंग्ठा बिल्डकॉनचे ललित रुंग्ठा हे लाभले असून सह प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच एल.आय.सी हौसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून हौसिंग डॉट कॉम यांचे सहकार्य लाभले आहे.त्याच प्रमाणे स्पॉट बुकिंग करण्याऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देण्यात येईल अशी माहिती नरेडको चे अध्यक्ष अभय तातेड ,सचिव सुनील गवादे यांनी दिली.

भूमिपूजन सोहळ्याला भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव,शिवसेना नेते अजय बोरस्ते ,नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड, होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर,सह समन्वयक शंतनू देशपांडे,भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह प्रशांत पाटील,पुरुषोतम देशपांडे,राजेंद्र बागड,अश्विन आव्हाड,मंदार राजेंद्र,अविनाश शिरोडे,सुनिल भायभंग,शशांक देशपांडे,नितिन सोनवणे,मयूर कपाटे,उदय घुगे, हर्षल धांडे,भाविक ठक्कर, पवन भगूरकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

3 minutes ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

9 minutes ago

मनमाड शहरात वाहतूक कोंडी; गाडी बंद, रस्ता बंद

वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; खासदारसाहेब, आम्हाला या जाचातून मुक्त करा! मनमाड : प्रतिनिधी दुष्काळी अन् पाणीटंचाई…

16 minutes ago

वीज वितरणकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट

दहमहा वीजबिलात दुप्पट, तिप्पट वाढ; ग्राहकांमध्ये संतापाची भावना निफाड : तालुका प्रतिनिधी वीज वितरण कंपनीकडून…

20 minutes ago

वारी…ज्ञानराज माउलींचे वरदान!

लोकीचे वैकुंठ पंढरपूर येथे होणारा आषाढीवारीचा महामेळा महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संचित आहे. 12 व्या…

32 minutes ago

पंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय

हाराष्ट्राचे आध्यात्मिक, परमार्थिक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पंढरीची वारी. महाराष्ट्रात भीमा नदीतीरावर असणार्‍या लोकविख्यात पवित्र तीर्थक्षेत्र…

37 minutes ago